नवी दिल्ली : राष्ट्रीय संकटावर राष्ट्रीय स्तरावरच चर्चा हवी, अशी मागणी करत शेतकरी अवस्थेवर संसदेचं अधिवेशन बोलवण्याच्या  ज्येष्ठ पत्रका पी साईनाथांच्या मागणीला, कृषीतज्ज्ञ आणि शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे यांनी पाठिंबा दिला आहे.


साईनाथ यांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतक-यांच्या मुद्यावर पी साईनाथांनी व्यक्त केलेल्या चिंतेबाबत तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. शेतकरी नेते चंद्रकांत वानखडेंपाठोपाठ आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही पाठिंबा दिलाय. 


राज्य सरकारला काहीही देणं घेणं 


साईनाथांचे विधान योग्य आणि वास्तववादी आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकारला शेतक-यांबाबत काहीही देणं घेणं नसल्याचा आरोप शेट्टींनी केलाय. शेतक-यांच्या मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठी समाजातील काही घटक जातीय आणि धार्मीक तेथ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 


देशातलं कृषीसंकट खूप मोठं


देशातलं कृषीसंकट खूप मोठं असून दिवसाला 2 हजार शेतकरी संपत आहे. त्यामुळे संसदेचे वीस दिवसांचं अधिवेशन बोलवावं, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केलीय. अधिवेशनात शेतक-यांनाही व्यथा मांडू द्या असंही साईनाथांनी नमूद केलंय.