नवी दिल्ली: कुत्रा सर्वात इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. आपल्या मलकाशी एकनिष्ठ आणि मैत्री करणार प्राणी म्हणजे कुत्रा. मात्र अनोळखी व्यक्ती दिसला की त्याच्यावर भुंकणं सुरू होतं. त्याच्या भुंकण्यानेच बरेचदा समोरचा घाबरतो. माणसच नाहीत तर प्राणीही कुत्र्याचा जरा वचकूनच असतात. काही दिवसांपूर्वी बबट्यालाही कुत्र्याने भुंकून पळवून लावल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. आता सोशल मीडियावर उंट आणि कुत्र्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुत्र्याचं लहान पिल्लू उंटाला पाहून जोरात भुंकत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सुरुवातीला लांबून आणि नंतर मोठ्या हिमतीनं उंटासमोर उभं राहून तो जोरात भुंकत आहे. मात्र कुत्र्याच्या पिल्लाला कोणतीही इजा हा उंट करत नाही. उलट त्याला प्रेमाने जवळ घेतो. 


सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हा कुत्रा उंटाजवळ जाऊन त्याच्यासमोर जोरात भुंकू लागतो. त्यावर उंट प्रतिक्रिया देत त्याला किस करतो. त्याला प्रेमाने जवळ घेतो. सोशल मीडियावर उंट आणि श्वानाच्या या व्हिडीओची खूप चर्चा होत आहे. 
रेडिट या सोशल मीडिया साईटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला अनेक युझर्सनी चांगल्या कमेंट्स केल्या आहेत. तर अनेक युझर्सनी उंटाने जे केलं ते योग्य केलं असंही म्हटलं आहे. या प्राण्याकडून माणुसकी शिकायला हवी असंही काही युझर्सनी म्हटलं आहे.