मुंबई : गुजरात आणि राजस्थान उपनिवडणूकीचे निकाल हे काँग्रेससाठी संजीवनी ठरणार आहेत, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर अशी चर्चा सुरू आहे की 2019 च्या निवडणूकीत काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकते. एक वर्षाअगोदर असं सांगण्यात येत होतं की, पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा सत्ता घेऊन येण्यात यशस्वी राहिल. मात्र गुजरातच्या निकालाने हे स्पष्ट केलं आहे की, 2019 मध्ये भाजपाची सत्ता आणणं तेवढं सोपं राहणार नाही. 


या मागे हे आहे मोठं कारण 


या अगोदर भाजपने यूपी, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार सारख्या राज्यांमध्ये अधिकाधिक सीट मिळवून दिल्लीत आपली जागा प्रस्थापित करण्यात यश मिळवलं होतं. मात्र आता अगदी शेवटपर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड सारख्या भाजप शासित राज्यात निवडणूक होत आहे. राजस्थानमधील उपनिवडणूकांनी स्पष्ट केले की, राज्यात भाजपचा विजय आता सोप नाही. यानंतर लगेचच लोकसभा निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणूकीत भाजपला अपेक्षित विजय मिळाला नसल्याचा थेट फायदा हा काँग्रेसला होणार आहे. 


राजकीय विश्लेषक काय म्हणतात 


त्यांच्या म्हणण्यानुसार हिंदी भाषिक राज्यात भाजपच्या 60 जागांचे नुकसान होत असतात. त्यामुळे भाजपला आता स्पष्ट बहुमत मिळणार नाही असं त्याचं मत आहे. याचा सरळ फायदा काँग्रेसला होणार आहे. काँग्रेस पुन्हा एकदा मोठी ताकद निर्माण होऊ शकतात. 


काय म्हणाले चेतन भगत? 


दैनिक भास्कला दिलेल्या मुलाखतीमझ्ये लेखक चेजन भगत यांनी या विषयावर आपलं मत व्यक्त केलं. जरी राहुल गांधी काँग्रेसचे नवे अध्यक्ष असले तरिही जर युवा नेता सचिन पायलट यांना पार्टीकडून पंतप्रधान पदाचे नवे उमेदवार घोषित केले तर हा उत्तम पर्याय असू शकतो. 


पुढे ते म्हणाले की, राहुल गांधी निर्विवाद नेता आहेत. मात्र निष्पक्ष मतदानाबाबत लोकांना त्याबाबत काही अडचणी आहेत. हे स्विंग वोटर इकडे किंवा तिकडे गेल्यामुळे मोठा फटका बसू शकतो. आता कोणत्याही पक्षाबद्दल स्पष्ट मत नसलेल्या मतदारांची संख्या आता वाढत आहे. 2014 मध्ये भाजपकडून नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार होते कारण तेच हे वोट खेचून आणण्यासाठी सक्षम होते. त्यामुळे अशा वोटरला खेचण्यासाठी काँग्रेसला पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची घोषणा करणं गरजेचं आहे. यासाठी सचिन पायलट हा उत्तम पर्याय असू शकतो.