मुंबई : तुम्हा माना अगर नका मानू, परंतु आपण आपल्या रोजच्या जिवनात बऱ्याच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. ज्या आपल्या डोळ्यांसमोरून जातात. हो हे खरं आहे. आपण ज्या गोष्टी पाहातो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण सगळं पाहिलं आहे. परंतु असं होत नाही. नकळत आपल्या डोळ्यासमोरुन अशा अनेक गोष्टी निघून जातात हे आपल्याला कळत नाही. सध्या सोशल मीडियावर या संबंधीत एक फोटो समोर आला आहे. जो सर्वांनाच कन्फ्यूज करत आहे. हा ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमध्ये एक चुक आहे जी आपल्याला शोधून काढायची आहे. परंतु सर्वांनाच ते शोधून काढता आलेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर या फोटोमध्ये एक चुक आहे जी सर्वांना शोधून काढायची आहे. तुम्हाला ती शोधता येतंय का ते पाहा.


खरंतर या फोटोवर एक ते नऊ पर्यंतचे अंक लिहिले आहेत, जे वेगवेगळ्या रंगात आहेत. काही लोकांनी आकडे पुन्हा पुन्हा पाहिले एवढेच काय तर त्याचे रंग देखील ओळखण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी देखील लोकांना यातं उत्तर सापडलेलं नाहीय.


आता तुम्हाला यासंदर्भात एक हिंट देतोय, पाहा तुम्हाला आता तरी ती चूक शोधता येतेय का? तुम्हाला फक्त अंकांवरती नाही, तर संपूर्ण फोटोवर नजर टाकायला हवी.


अजूनही तुम्हाला याचं उत्तर सापडलं नाही तर बातमी खाली स्क्रोल करा.
.
.
.
.
.



पाहा ही आहे त्या फोटोमधील चूक



अंकांऐवजी इंग्रजी शब्दांकडे लक्ष दिल्यास चूक कुठे आहे ते कळेल. जसे आपण इंग्रजीत पाहू शकतो 'Can You Find The Mistake' यानंतर 1,2,3,4,5,6,7,8,9 हे अंक लिहिलेले आहेत. परंतु तुम्ही नीट पाहिलंत, तर तो इंग्रजी शब्द हा दोनदा लिहिला आहे.


आता नक्कीच तुम्हाला ही चूक तुमच्या लक्षात आली असेल. आता तुम्ही तुमच्या मित्रांना हा फोटो पाठवा आणि त्यांना देखील कन्फ्यूज करा.