Canada India Issue Latest Updates: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) याच्या हत्येनंतर भारतावर रोष व्यक्त करणाऱ्या कॅनडानं आता काहीशी माघार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून कॅनडा आणि भारत या दोन्ही देशांमध्ये कमालीच्या तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असणाऱ्या या प्रकरणात बरेच आरोप प्रत्यारोपही झाले. इथं भारतानं ठाम भूमिका घेत वेळोवेळी कॅनडाचे आणि तेथील सत्ताधाऱ्यांचे कान टोचण्याचं काम केलं आणि भारताच्या या आक्रमक भूमिकेपुढं अखेर कॅनडानं माघार घेतल्याचं त्यांच्या एकंदर कृतींवरून पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतानं या वादाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली भूमिका पाहता कॅनडानं निर्धारित कालावधीच्या आधीच भारतात रुजू असणाऱ्या जास्तीत जास्त राजदूतांना क्वालालांम्पूर, सिंगापूरला पाठवलं आहे. भारताकडून कॅनडाला त्यांच्या राजदूतांची संख्या कमी करण्यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी दिला होता. ज्यानंतर ही पावलं उचलण्यात येत आहेत. 


वाद विकोपास.. 


खलिस्तानी दहशतवादी निज्जर (Hardeep Singh Nijjar) ची जून महिन्यात कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्यामुळं वादाची ठिणगी पडली आणि त्याच धर्तीवर राजदूतांची संख्या कमी करण्याचे निर्देश भारताकडून कॅनडाला देण्यात आले होते. 


हेसुद्धा वाचा : Video : 'तुम्ही नालायक आहात, देशाची...', संतापलेल्या नागरिकांसमोर पंतप्रधान ट्रुडोंनी ठोकली धूम!


 


तिथं कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी संसदेत वक्तव्य करत या प्रकरणामध्ये भारतीय गुप्तहेरांची भूमिका असल्यासंबंधिची वक्तव्य केली होती. ज्यानंतर भारताकडून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्या क्षणापासून कॅनडा आणि भारत या दोन्ही देशांमधील परिस्थिती दिवसागणिक चिघळताना दिसली. कॅनडातील नागरिकांसाठी भारताकडून व्हिसा सुविधा बंद करण्यात आली आहे. तर, यंत्रणांच्या वतीनं आगामी काळात कॅनडात जाणाऱ्या नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात येत आहे. 


कॅनडासोबतचा वाद विकोपास जाताना पाहून भारताकडून या देशातील दूतावासात काम करणाऱ्या राजदूतांची देशातील संख्या कमी करण्याची विचारणा करण्यात आली. कॅनडानं असं न केल्यास राजदूतांची 'डिप्लोमॅटिक इम्युनिटी' हटवली जाणार असल्याचा इशाराही भारताकजडून देण्ताय आला. ज्यानंतर आता कॅनडानं जवळपास 41 राजदूत कॅनडानं इतर राष्ट्रांमध्ये पाठवले आहेत.