भोपाळ:  केंद्र सरकारच्या Unlock 1 धोरणातंर्गत आजपासून देशभरातील धार्मिक स्थळे खुली होणार आहेत. त्यामुळे भाविकांना आपल्या लाडक्या दैवताचे दर्शन घेता येईल. मात्र, भोपाळमध्ये एक वेगळाच वाद सुरु झाला आहे. येथील काही मंदिरामधील पुजाऱ्यांनी मंदिरात सॅनिटायझर वापरण्यास विरोध केला आहे. सॅनिटायझरमध्ये दारुचा अंश आहे. दारु प्यायलेल्या व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मंदिरात सॅनिटायझरही वापरु नये. सरकारचे काम आदेश देणे हेच आहे. मात्र, मंदिरात सॅनिटायझर मशिन लावण्याला आमचा विरोध आहे, असे माँ वैष्णवधाम नवदुर्गा मंदिराचे पुजारी चंद्रशेखर तिवारी यांनी सांगितले. त्याऐवजी आम्ही लोकांना हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था करु, असे तिवारी यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दिला बाळाला जन्म, नावं ठेवलं ‘सॅनिटायझर’


आजपासून देशभरात धार्मिक स्थळे सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी धार्मिक संस्थांनांना स्वच्छता व गर्दी होणार नाही, या गोष्टींची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी सॅनिटायजरचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासोबत गाभाऱ्यातील मुर्तीला स्पर्श न करणे, प्रसाद, नारळ-हार इ. गोष्टी अर्पण करण्यास सध्या मनाई करण्यात आली आहे.


रडत रडत चिमुकलीने मागितली मुख्यमंत्र्यांची माफी; VIDEO VIRAL

दरम्यान, LocalCricles या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार धार्मिक स्थळे सुरु करण्याची परवानगी दिली असली तरी अजूनही बरेसचे लोक मंदिरात जाण्याच्या मनस्थितीत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी गेल्यास कोरोनाची लागण होण्याचा धोका असल्यामुळे लोक जवळपास ५७ टक्के लोक मंदिरात जायला घाबरत असल्याची माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.