बागपत: पुरात अडकलेल्या एका व्यक्तीनं चक्क गाडी आणि आपला जीव वाचवण्यासाठी अजब शक्कल लढवली. आपल्या कारलाच त्याने होडी बनवत त्यावरून पुढे जात आपला जीव वाचवण्याची धडपड केली. या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की या व्यक्तीनं आपला जीव वाचवण्यासाठी गाडीच्या टपावर बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती मिळाली आहे. तिथे सध्या काही भागांमध्ये पूरस्थिती आली आहे. हा व्हिडीओ बागपत इथल्या एका अंडरपासजवळचा आहे. परिसरात पाणी भरल्यामुळे तिथल्या अनेक गाड्या पुराच्या पाण्यासोबत वाहून गेल्या. पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे. 



काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरानं थैमान घातलं होतं. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत भीषण होती. महापुरानं संसार उद्ध्वस्त झाले. गाड्या वाहून गेल्या. जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावर जाऊन उभं राहण्याची वेळ आली होती. त्यानंतर आता उत्तर प्रदेशात पुरानं गंभीर परिस्थिती ओढवली आहे. पुरामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठं नुकसान झालं आहे.