नवी दिल्ली : भारतीय रस्त्यांवर पुन्हा एकदा Luna Moped ची एँट्री होणार आहे. Kinetic Luna इलेक्ट्रिक मोपेडच्या स्वरुपात लॉंच होणार आहे. भारतीय ग्राहकांची गरज ओळखून अनेक ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर लॉंच करीत आहेत. यात मार्केटमध्ये इलेक्ट्रिक लुना देखील सामिल होत आहे. Kinetic कंपनी एकेकाळी आपल्या पॉप्युलर लुना मोपेडला पुन्हा इलेक्ट्रिक अवतारात लॉंच करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1970 आणि 1980 च्या दशकात मोटारसायकल खरेदीची सर्वसामान्यांची क्षमता नव्हती. त्यावेळी Kinetic Luna खरेदी करून सर्वसामान्य आपली हौस भागवत असत. 50 CCच्या या मोपेडला पॅडलसुद्धा होते. कालांतराने मार्केटमध्ये ही मोपेड मागे पडली. मोठ्या कालावधीनंतर Kineticने भारतीय बाजारात कमबॅक केले आहे. Kinetic Green ने इलेक्ट्रिक रिक्षा देखील लॉंच केली आहे. लवकरच कंपनी आपल्या 2 व्हिलर सेगमेंटमध्येही काम करणार आहे. 


Kinetic Luna Electric च्या फीचर्सचा अंदाज सूत्रांनी लावला आहे. यामध्ये 1kW पावर जनरेट करण्यासाठी Lithium ion बॅटरीचा पॅक मिळू शकतो. सिंगल चार्जमध्ये 70 ते 80 किलोमीटर चालवता येईल. तसेच या मोपेडची टॉप स्पीड 25 kmph इतकी असू शकतो. तर किंमत 50 हजार रुपये असू शकते.