Car Insurance New Rules: देशात कार इन्शुरन्स (Car Insurance) काढणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. आपल्याला प्रवासादरम्यान काही झाले किंवा अचानक कुठला अपघात झाला तर त्यासाठी या विम्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्हालाही योग्य वेळी कार इन्शुरन्स (Car Insurance Update) काढणे अत्यंत गरजेचे असते. देशभरात कार अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे त्यातून मुंबई-पुण्यासारख्या (Mumbai Pune Car Accidents) शहरांमध्ये तर अपघांतांची संख्या फोफावते आहे. त्यामुळे वर्षभरात मोठ्या संख्येने अपघात होताना दिसत आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे कार आहे त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी विमा (Car Insurance for Family) काढणं गरजेचे आहे. (Car Insurance new rules if you dont have a car insurance then money will deducted from fastag account for new insurance premium)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा कार मालक विमा काढताना दिसत नाहीत आणि त्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. केंद्र सरकारकडून कार इन्शुरन्समध्ये अनेक अपडेट्स येत असतात. यंदाही अशीच एक अपडेट समोर येते आहे. केंद्र सरकार आता कार इन्शुरन्स काढण्यासाठी फार आग्रही झाले आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता जर का तुम्ही विमा काढला नसेल तर तुम्हाला जर पकडले तर तुम्हाला तिथल्या तिथे विमा काढावा लागू शकतो, असा महत्त्वाची सूचना परिवहन मंत्रालयाकडून (Transport Ministry) येताना दिसते आहे.


समोर आलेल्या अपडेटनुसार, ज्यांच्याकडे कार इन्शुरन्स नाही त्यांना अनेकदा मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते आहे. 50 टक्के अपघात हे कार इन्शुरन्सशिवाय असलेल्या चालकांचे झाले आहेत. सध्या त्यामुळे कार चालकांनी कार इन्शुरन्स (How To apply for a Car Insurance) काढणे महत्त्वाचे आहे. 


काय आहेत नवे बदल? 


यामध्ये पोलिस आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटतर्फे (Police and Transport Department) नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून रस्त्यावरील ट्रॅफिकमध्ये सर्व कार मालकांची तपासणी करण्यात येईल आणि त्यानूसार जर का तुम्ही कार विमा काढला नसेल तर तुम्हाला त्यावरील होणारी कारवाईही सहन करावी लागणार आहे. जर का तुमच्याकडे कार विमा नसेल तिथल्या तिथे भर ट्रॅफिमध्ये तो तुम्हाला काढावा लागेल आणि मग तुमच्या फास्टटॅग अकाऊंटमधून (Fastag Account) तेवढे पैसे कमी होतील. 


हेही वाचा - Kailasa in UN Meeting: साध्वीच्या वेशभूषेतील ही महिला कोण? काल्पनिक देश 'कैलासा'वरून चक्क भारतावर केले गंभीर आरोप


कसा काढाला थर्ड पार्टी विमा? 


याच्या अंमलबजावणीसाठी शिफारशी करण्यात आल्या असून त्यासाठी 17 मार्चच्या बैठकीतही यावर चर्चा होणार आहे. हे तात्काळ विम्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. म्हणून तुम्हाला थर्ड पार्टी फास्ट टॅग (Third Party Insurance) काढावा लागणार आहे. तुमच्या गाडीच्या साईजवरून तुम्हाला हा विमा काढावा लागणार आहे. यातील किंमत ही 2 हजार रूपयांपासून ते 7 हजार रूपयांपर्यंत आहे.