Car Price Hike | याच महिन्यात खरेदी करा कार! ऑगस्ट पासून कारच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ
मारूतीनंतर आता होंडा कार्स इंडियानेदेखील आपल्या कारच्या किंमतींमध्येव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : मारूतीनंतर आता होंडा कार्स इंडियानेदेखील आपल्या कारच्या किंमतींमध्येव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जपानच्या दिग्गज ऑटोमेकर कंपनीने पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टपासून आपल्या कार्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही कार घेण्याचा विचार करीत असाल तर, याच महिन्यात कार घेण्याचा निर्णय घेऊ शकता.
1 तिसऱ्यांदा वाढवल्या जातील किंमती
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारूती सुजूकी इंडियाने आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये (जुलै-सप्टेंबर)मध्ये आपल्या कारच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. BSE च्या एका रेग्युलेटरी बॉडीला कंपनीने तशी माहिती दिली आहे.
2 कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती
होंडा कार्स इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, स्टीलसह धातूंच्या किंमती वाढल्याने कंपनीला हे पाऊल उचलावे लागत आहे. कारांच्या उत्पादनात अनेक प्रकारच्या धातूंचा वापर होतो.
या कारच्या किंमती कितीने वाढणार याबाबत अद्यापतरी खात्रीशीर माहिती उपलब्ध झालेली नाही.