Cardamom auction : दिवाळी झाली की राज्यात हिवाळ्याची (winter) चाहुल लागते. मग अनेक घरात अदरक आणि वेलची चहाचा बेत बनतो. थंडीमध्ये गरम गरम वेलची चहाचा (Cardamom tea) आस्वाद घेण्याची मजाच काही औरच असते. घरातील इवल्याश्या वेलचीच कमाल खूप भारी आहे तुम्हाला माहिती आहे का? या वेलचीच्या सेवनाने नवऱ्या-बायकोमधील प्रेम वाढण्यास मदत होते. वेलची तशी भारतात लाखो रुपयांची कमाई करु देते. या वेलची वापर चहापासून भाजी, गोड पदार्थांमध्ये करता येतात. अनेक शेतकरी आता वेलचीची शेती करण्याचा नवा प्रयोग करु लागले आहे. भारतात सर्वदुर वेलचीची शेती होत असली तरी कर्नाटक (Karnataka), केरळ  (Kerala) आणि तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) मोठ्या प्रमाणात याची लागवड केली जाते.


इवल्याश्या वेलचीचा लिलाव कसा होतो? (cardamom auction Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला वेलचीचा लिलाव कसा होता हे तुमही कधी पाहिलं आहे का? सोशल मीडियावर इवल्याश्या लिलाव कश्या प्रकारे केला जातो याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  वेलचीचा पहिला ई-लिलाव शनिवारी पुट्टडी आणि बोडीनायकानूरमधील स्पाइसेस पार्कमध्ये पार पडला. या इवल्याश्या वेलचीला कमाल किंमत ₹1,468 प्रति किलो आणि सरासरी किंमत ₹1,084 मिळाली. (cardamom auction live Video Instagram nmp )


असा झाला लिलाव 


सोशल  मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, कॅम्पूटरसमोर अनेक लोकं रांगेत भांडे घेऊन बसले आहेत. त्यानंतर पुढे या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती त्यांच्या भांड्यामध्ये वेलची फेकत जातो. त्यानंतर ही लोकं म्हणजे व्यापारी त्या वेलचीची तपासणी करतात आणि त्याचा भाव ठरवतात. 2,296.90 किलो वेलचीपैकी 1,832.30 किलो वेलची विक्री झाली. हा लिलाव साऊथ इंडियन ग्रीन वेलची कंपनी लि.मास एंटरप्रायझेस लिमिटेडने आयोजित केला होता. 



इवल्याश्या वेलचीची कमाल लय भारी


वेलचीचा वापर अन्न, मिठाई, पेये (Food, sweets, drinks) बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे भारतासह विदेशातही वेलचीची मागणी मोठी मागणी आहे. अशातच जर तुमच्याकडे जमीन असेल आणि तुम्ही त्यावर शेती करण्याचा विचार करत असाल तर नक्की करा. कारण जेवढे मोठे क्षेत्र पिकवेल, तेवढा नफा मोठ्या (The larger the area cultivated, the greater the profit) प्रमाणात कमवाल.