नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातील कारकिर्दीनंतर राजकीय पटलावर तितक्याच प्रभावीपणे नव्या राजकीय खेळीची सुरुवात करणारे भाजप खासदार गौतम गंभीर काहीसे अडचणीत सापडले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील राजेंद्र नगर येथे असणाऱ्या घराजवळून गौतम यांच्या वडिलांची एसयुव्ही चोरीला गेली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचं वृत्त समोर येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या घटनेमध्ये दीपक गंभीर यांची पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर ही आलिशान कार चोरीला गेली आहे. 


सध्या पोलीस या प्रकरणीचा तपास लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत आहेत. दरम्यान, सदर प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. 


  



कार चोरिला गेलेल्या प्रकरणी अधिक माहिती देत डीसीपी सेंट्रल संजय भाटीया म्हणाले, 'काल (गुरुवारी) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही कार घराबाहेर पार्क करण्यात आली. जी सकाळी चोरीला गेल्याची बाब समोर आली. सध्यातरी या प्रकरणी प्राथमिक स्तरावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तरीही त्याबाबतचा तपास अद्यापही सुरुच आहे'.