काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने धाड टाकली असून, यावेळी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली आहे. गेल्या पाच दिवसांसापासून 50 बँक अधिकारी पाच काऊंटिंग मशीनच्या सहाय्याने पैशांची मोजणी करत आहेत. अखेर जप्त केलेल्या या रकमेची मोजणी संपली असून, आकडा 353.5 कोटींवर पोहोचला आहे. झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा येथील ठिकाणांवर आयकर विभागाने धाड टाकली होती. यादरम्यान त्यांना रांची येथे 30 कपा़टांमध्ये ही रोख रक्कम सापडली. दरम्यान, ही कोणत्याही तपास यंत्रणेची सर्वात मोठी कारवाई ठरली असून, जप्त रकमेने मागील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंडमधून काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्याशी संबंधित रांची आणि इतर ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोख रकमेची मोजणी जवळपास संपली आहे. बालंगीर जिल्ह्यात सर्वात जास्त रक्कम सापडली आहे, जी अंदाजे 305 कोटी आहे. त्यानंतर संबलपूर आणि टिटलागड येथे अनुक्रमे 37.5 कोटी आणि 11 कोटी सापडले आहेत.


धाडीत सापडलेली रक्कम अधिकारी बालंगीर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जमा करणार आहेत. दरम्यान याचा रोजच्या कामकाजावर काही परिणाम होणार नाही असं बँकेच्या व्यवस्थापकाने सांगितलं आहे. 


एसबीआयचे स्थानिक व्यवस्थापक भगत बेहरा यांनी सांगितलं आहे की, टीमने 176 पैकी 140 बँगेंची मोजणी केली असून, अद्याप 36 बाकी आहेत. "आम्हाला 176 बॅग मिळाल्या असून त्यापैकी 140 ची मोजणी झाली आहे. बाकी बॅगेंची आज मोजणी केली जाईल. 3 बँकांचे अधिकारी मोजणी प्रक्रियेत सहभागी आहेत, आणि आमचे 50 अधिकारी सहभागी आहेत. सुमारे 40 काऊटिंग मशीन येथे आणण्यात आल्या आहेत. 25 मशीन्स वापरल्या जात असून 15 बॅकअप म्हणून ठेवल्या आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली आहे. 


हा कारवाई मद्य व्यवहाराशी संबंधित करचोरीमुळे करण्यात आली आहे. आयकर विभागाने याच आरोपात मद्य व्यवहाराशी संबंधित कंपनीच्या ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये बौद्ध डिस्टीलरी प्रायव्हेट लिमिटेड, बलदेव साहू इन्फ्रा लिमिटेड, क्वालिटी बॉटलर्स आणि किशोर प्रसाद-विजय प्रसाद बिवरेज लिमिटेड कंपन्यांचा सहभाग होता. यामधील एक कंपनी बलदेव साहू इन्फ्रा फ्लाई ऐश विटांचा व्यवसाय करते, तर इतक कंपन्या दारुशी संबंधित व्यवसायात आहेत. 


धीरज साहू यांची घोषित संपत्ती


धीरज साहू यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं गेल्यास, 2018 मध्ये राज्यसभा निवडणुकीदरम्यान धीरज प्रसाद साहू यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्यानुसार त्यांची संपत्ती 34 कोटी सांगितली जात होती. त्यांनी स्वत:वर 2.36 कोटींचं कर्ज असल्याचंही जाहीर केलं होतं. तर आर्थिक वर्ष 2016-17 दरम्यान आयकर परताव्यात 1 कोटी उत्पन्न असल्याचा दावा केला होता.