इमानदार मांजर! मालकाचा जीव वाचवण्यासाठी कोब्राशी भिडली
मालकाला वाचवणाऱ्या मांजरीच्या धाडसाचा व्हिडीओ तुम्ही पाहाच....`वफादार कुत्ता ही नहीं बिल्ली भी होती है!`
ओडिसा: कुत्र्याला इमानदार प्राणी म्हणतात तर मांजरीला स्वार्थी म्हणून सतत नावं ठेवली जातात. पण प्रत्येक प्राण्याचं आपल्या मालकावर तितकाच जीव असतो. याचं उत्तम उदाहरण सांगणारी एक घटना समोर आली आहे. इमानदार कुत्राच नाही तर मांजरही असू शकतं. मी असं म्हणण्यामागे विश्वास बसणार नाही तर हा व्हिडीओ नक्की पाहायला हवा.
आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी चक्क एक मांजर घराबाहेर तब्बल 30 मिनिटं पाहारा देत होती. तिच्यासमोर असलेल्या कोब्रालाही ती घाबरली नाही. तर तिने त्याचा धीटपणे सामना केला. मात्र कोब्राला घरात घुसू दिलं नाही. कोब्राच्या समोर बसून ही मांजर तो कुठे जाऊ नये यासाठी पाहारा देत होती. त्याने आपल्या मालकाला इजा करू नये म्हणून ती ही काळजी घेत होती. या मांजरीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
या धाडसी मांजरीचं ग्रामस्थच नाही तर सोशल मीडियावर युझर्सही खूप कौतुक करत आहेत. ही घटना ओ़डिशा राज्यातील भुवनेश्वर परिसरात घडली आहे. कोब्रा आल्याची माहिती मिळताच तातडीनं सर्पमित्रांनी घटनास्थळी दाखल होत कोब्राला पकडलं.
स्थानिक लोकांनी या मांजरीच्या धाडसाचं कौतुक केलं. त्यांनी कोब्राची माहिती हेल्पलाईन द्वारे कर्मचाऱ्यांना दिली. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी पोहोचून कोब्राला पकडलं. या मांजरीनंच तिच्या मालकांचा जीव वाचवल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली आहे.