Cat Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. फक्त माणसांचेच नाहीतर प्राण्यांचेसुद्धा असे काही व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडीओ पाहून आपल्या डोळ्यात पाणी येतं तर काही व्हिडीओ पाहताना हसून हसून डोळ्यात पाणी येतं. मात्र पाळीव प्राणीही काही कमी करामती नसतात. अशाच एका करामती मांजरीचा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. (Viral Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओमध्ये काय?
एक मांजर पलीकडील छतावर जाण्यासाठी लोखंडी रीलिंगच्या साहाय्याने जाताना दिसत आहे. मात्र ती ज्या अंदाजात आहे ते पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटत आहे. कारण एखादा साप जसा नागमोडी वळणासारखा जातो तशी मांजर जात आहे. 

 



 


व्हिडीओमधील रीलिंगमध्ये लोखंडी बार आहेत. दोन लोखंडी बारमधून मांजर जात आहे, त्या दोन बारमध्ये अंदाजे 4 इंच इतका गॅप असेल. मांजर प्रत्येक बारमधून जात असलेली दिसत आहे. शेवटपर्यंत मांजर तशीच जाताना दिसत आहे. 


दरम्यान, मांजरीचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणत आहेत की, मांजरीला गोल्ड मेडल दिलं पाहिजे. त्यासोबतच ही मांजर जिमनॅस्टीकमध्ये चॅम्पियन असल्याचं म्हटलं आहे.