मुंबई: इन्कम टॅक्स रिटर्न ज्यांनी अजूनही भरला नाही त्यांना दिलासा देणारी बातमी आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या मुदतीत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्यांनी भरला नाही अशा नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय त्यांना केंद्र सरकारनं फाइन बसून नये म्हणून ही एक शेवटची संधी दिली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यतिरिक्त, टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत व्यवहारांबाबत अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यालाही तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत व्यवहारांबाबत अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2021 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.


अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर होती. ही मुदत वाढवून 31 ऑक्टोबर करण्यात आली होती. ही मुदत आता पुन्हा केंद्राने वाढवून 15 जानेवारी केली आहे. या बदलांमुळे आता कोरोना, लॉकडाऊन या सगळ्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाखो करदात्यांना फायदा होणार आहे. 


टेक्नोलॉजी कंपनी Infosysने ITR फाइल करण्यासाठी नवीन पोर्टल तयार केलं आहे. हे पोर्टल 7 जून रोजी लाँच करण्यात आलं. याआधी incometaxindiaefiling.gov.in  या वेबसाईटवर जाऊन ITR फाइल करावा लागत होता. आता incometax.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला आयटीआर फाइल करावा लागणार आहे. मात्र या साइटवर अनेक अडचणी येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे अजून बऱ्याच लोकांचे IRT भरायचे राहिले आहेत. 


Income Tax 2.0 नव्या पोर्टलमध्ये तुम्ही नवीन पेमेंट पद्धत वापरू शकणार आहात. नेट बँकिंग, UPI, क्रेडिट कार्ड, RTGS आणि NEFT द्वारे पेमेंट करता येणार आहे. नव्या साईटवर आयटीआर भरणं सोप आणि वेगानं होऊ शकेल असं सांगितलं जात आहे.