गुरुग्राम : गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलाय. हरियाणा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सीबीआयने आपल्याकडे घेतला असून या प्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन जणांची सीबीआयची टीम सकाळीच रायन इंटरनॅशनल शाळेत दाखल झालीय. प्रद्युम्नच्या हत्या प्रकरणाच्या तपासावर प्रद्युम्नचे वडिल वरुण ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली होती. 


रायन इंटरनॅशनल शाळेच्या मालकांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. प्रद्युम्नच्या हत्येचं खरं कारण शोधण्यासाठी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी प्रद्युम्नच्या वडिलांनी केली होती. मात्र तपास सीबीआयकडे सोपवला जात नसल्याने त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचं ठरवलं होतं. 


तसंच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनाही पत्र लिहिलं होतं. अखेर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी प्रद्युम्नच्या घरी जाऊन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात येत असल्याची घोषणा केली.