नवी दिल्ली : पुन्हा एकदा काळापैसा पांढरा करणाऱ्या बनावट कंपन्यांच्या विरोधात सरकारने कारवाई सुरु केली आहे. आज सकाळी सीबीआयने देशभरात छापे टाकले. या दरम्यान पश्चिम बंगाल आणि रांचीमध्ये अनेक ठिकाणांवर छापे मारले गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रांचीमध्ये माजी इनकम टॅक्स विभागाचे प्रमुख सचिव तपस दत्ता यांच्या  कोलकाता येथील घरी देखील सीबीआयने छापे मारले. सीबीआयचे अधिकारी कागदपत्रांची चौकशी करत आहेत.


देशभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या काळापैसा पांढरा करण्याचं काम करत आहेत. काही दिवसांपूर्वीच आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती आणि जावई शैलेश कुमार यांच्याविरोधात देखील अशीच कारवाई करण्यात आली होती.