CBSE दहावी, बारावी रिझल्ट कधी? जाणून घ्या महत्वाची अपडेट
CBSE 10th and 12th Result Update: सीबीएसईकडून कोणत्या तारखेला निकालाची घोषणा होऊ शकते? जाणून घेऊया.
CBSE 10th and 12th Result Update: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी, मार्चमध्ये संपल्या. आता सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षांच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. सर्वांची नजर आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या निकालावर आहे. सीबीएसई बोर्डाकडून लवकरच दहावी, बारावी विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. सीबीएसईकडून कोणत्या तारखेला निकालाची घोषणा होऊ शकते? जाणून घेऊया.
तिन्ही स्ट्रीमचा रिझल्ट एकत्र लागणार?
सीबीएसई बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहेत. सीबीएसईकडून सर्वात आधी बारावी बोर्डाचे निकाल जाहीर केले जातील. ज्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या टॉपर्सची नावे असतील. यानंतर दहावीचा निकाल जाहीर केला जाईल.
2023 मध्ये कधी लागला होता निकाल?
सीबीएसई बोर्डाकडून दहावी, बारावी 2024 च्या निकाल तारखेची माहिती समजण्यासाठी मागच्या 3 वर्षांचा पॅटर्न समजून घेऊया. 2023 मध्ये बारावीचा निकाल 12 मेला जाहीर करण्यात आला होता. 2022 मध्ये 17 मेला आणि 2021 मध्ये 3 मेला निकाल जाहीर करण्यात आला होता. सीबीएसई मेच्या पहिल्या आठवड्यात बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करु शकते. असे असले हा एक अंदाज आहे. सीबीएसई बोर्डाकडून यासंदर्भात कोणती अधिकृत माहिती देण्यात आली नाही. किंवा याला दुजोराही देण्यात आला नाही.
दहावी उत्तीर्णांनो, भविष्यात IPS बनायचंय? मग या चुका अजिबात करु नकाच
केव्हा झाली होती परीक्षा?
सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा मार्चमध्ये आयोजित करण्यात आली होती. तर बारावी बोर्डाची परीक्षा 2 एप्रिलला संपत आहे. आता दहावी, बारावीचे विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत.
घरबसल्या कसा तपासाल निकाल?
सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल तपासण्यासाठी सर्वप्रथम सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जा. होमपेजवर CBSE 12th Result आणि CBSE 10th Result ची लिंक दिसेल.
ज्या इयत्तेचा निकाल पाहायचा आहे, त्यावर क्लिक करा. स्क्रिनवर एक पेज खुलेल. ज्यामध्ये तुमचा रोल नंबर आणि इतर डिटेल्स भरा. आता सबमिट बटणावर क्लिक करा. भविष्यातील उपयोगासाठी रिझल्ट डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.