दहावी उत्तीर्णांनो, भविष्यात IPS बनायचंय? मग या चुका अजिबात करु नका

 आयपीएस होण्यासाठी तुम्ही विज्ञान, वाणिज्य आणि कला यासारख्या कोणत्याही शाखेची निवड करू शकता.

| Mar 02, 2024, 20:16 PM IST

IPS Tips: आयपीएस होण्यासाठी तुम्ही विज्ञान, वाणिज्य आणि कला यासारख्या कोणत्याही शाखेची निवड करू शकता.

1/7

दहावी उत्तीर्णांनो, भविष्यात IPS बनायचंय? मग या चुका अजिबात करु नका

How to Become IPS After SSC Career Tips

IPS Tips: तुम्ही सध्या दहावीमध्ये शिकताय? किंवा दहावी उत्तीर्ण आहात आणि आयपीएस बनण्याचा विचार करताय? मग ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आयपीएस होण्यासाठी दहावी आणि अकरावीनंतर योग्य स्ट्रिम निवडणे खूप गरजेचे आहे.

2/7

योग्य विषय निवडा

How to Become IPS After SSC Career Tips

आयपीएस होण्यासाठी तुम्ही विज्ञान, वाणिज्य आणि कला यासारख्या कोणत्याही शाखेची निवड करू शकता. पण योग्य विषय निवडल्यास एक मजबूत पाया तुम्हाला मिळेल. 

3/7

सायन्स स्ट्रिम

How to Become IPS After SSC Career Tips

सायन्स स्ट्रिम ही पीसीएम आणि पीसीबी अशा दोन भागात विभागलेला आहे. PCM मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित शिकवले जाते. तर PCBमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र शिकवले जाते.  तुम्हाला फॉरेन्सिक सायन्स, क्रिमिनोलॉजी आणि सायबर सिक्युरिटी या विषयांमध्ये रस असेल तर तुम्ही सायन्स स्ट्रिम निवडा.

4/7

आर्ट्स स्ट्रिम

How to Become IPS After SSC Career Tips

कला शाखेत तुम्हाला इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळते. हे विषय सामाजिक समस्या, मानवी वर्तन आणि शासन याविषयी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतात.  तुम्हाला आर्ट्सची आवड असेल तर तुम्ही हा प्रवाह निवडा.

5/7

कॉमर्स स्ट्रिम

How to Become IPS After SSC Career Tips

कॉमर्स स्ट्रिममध्ये अकाउंटन्सी, बिझनेस स्टडीज, इकॉनॉमिक्सच्या मदतीने व्यवसाय आणि वित्त यावर लक्ष केंद्रित केले जाते. तुम्ही आर्थिक बजेट आणि अर्थशास्त्र धोरण इत्यादी विषयांच्या माहितीसाठी ही स्ट्रिम निवडू शकता.

6/7

तोच विषय विद्यार्थ्यांनी निवडा

How to Become IPS After SSC Career Tips

तुम्ही कोणता विषय निवडाल हे तुमच्या वैयक्तिक आवडींवर अवलंबून आहे. आयपीएसची तयारी करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या शैक्षणिक पार्श्वभूमीतून येतात. असे असले तरी आपल्याला ज्या विषयात रस आहे, तोच विषय विद्यार्थ्यांनी निवडावा.

7/7

यूपीएससी परीक्षा

How to Become IPS After SSC Career Tips

आयपीएस होण्यासाठी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा (CSE) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतली जाते.