मुंबई : सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. बारावीची परीक्षा १ जुलै ते १५ जुलै या कालावधीपर्यंत असणार आहे. यासोबतच नॉर्थ-दिल्लीत सीबीएसईची दहावीची परीक्षा देखील याच तारखांना होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनमुळे सीबीएसईच्या मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षा थांबवण्यात आल्या होत्या. सीबीएसई सचिव अनुराग त्रिपाठी यांनी दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये दहावीच्या बोर्डाची परीक्षा होणार नसल्याची घोषणा केली होती. मात्र बारावीच्या बोर्डाची परीक्षा होणार असल्याचं म्हटलं होतं. 



सीबीएसईने अगोदरच जाहीर केलं होतं की, दहावीची परीक्षा होणार नाही. फक्त नॉर्थ ईस्ट दिल्लीतील विद्यार्थ्यांकरता परीक्षा आयोजित केल्या आहेत. सीबीएसईच्या ३००० शाळांना परीक्षा केंद्र बनवण्यात आले आहेत. या ३००० परीक्षा केंद्रांवरून उत्तर पत्रिका घेऊन शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. त्यांनतर पेपर तपासण्याचं काम सुरू होणार आहे.


कोरोना व्हायरसमुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. सीबीएसई बोर्ड आगामी बोर्ड परीक्षांकरता काही नियमावली तयार करत आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेचा सर्वात पहिला विचार करत आहेत.