मुंबई : देशात कोरोना व्हायरस या महामारीचा मोठा फटका विद्यार्थ्यांच्या परीक्षांना बसत आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येमुळे १० वी आणि १२वीच्या परीक्षा रद्द होणार असल्याच्या चर्चा सर्वदूर पसरत होत्या. आता मात्र CBSEने या सर्व चर्चांचा पूर्णविराम दिला आहे. CBSEचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी परीक्षांबद्दल वक्तव्य केलं आहे. २०२१ या वर्षातील १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. परीक्षांचे वेळापत्रक cbse.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत. लवकरच परीक्षांचं वेळापत्रक देखील जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षांसंबंधी CBSE अंतिम निर्णय घेणार असून वेळापत्रक देखील जाहीर करण्यात येणार असल्याचं  त्यांनी सांगितलं आहे. ' त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.


बोर्ड सचिव अनुराग त्रिपाठी हे ASSOCHAM द्वारा आयोजित नवीन शिक्षण धोरण वेबिनारमध्ये बोलत होते. या महामारीच्या काळात शिक्षण व्यवस्थेचं मोठं सकंट डोक्यावर होत. मात्र ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे यामध्ये खंड पडला नसल्याचं देखील ते म्हणाले. 


दरम्यान, महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्यानंतर पुण्यातील (Pune) शाळा (School) १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहे.