Google ला 1337 कोटींचा दणका, वाचा नेमकं प्रकरण काय?
CCI On Google : भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाची (CCI) जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनवर मोठी कारवाई...
Google Fined: आपल्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल भारतीय आयोगाने गुगलला 1337 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अँड्रॉइड मोबाईल डिव्हाइस इकोसिस्टममध्ये एकाहून अधिक बाजारपेठेमध्ये आपल्या प्रबळ स्थानाचा गैरवापर केल्याबद्दल भारतीय स्पर्धा आयोगाने गुरुवारी टेक दिग्गज गुगलला 1337.76 कोटींचा दंड ठोठावला.
CCI ने आघाडीच्या इंटरनेट कंपनीला अनुचित व्यापार पद्धती थांबवण्याचे निर्देश दिले. आयोगाने गुरुवारी एका पत्रात म्हटले आहे की, Google ला देखील निर्धारित कालावधीत कार्य करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गुगल इंडियाने संगीत, ब्राउझर, अॅप लायब्ररी आणि अन्य सेवांत वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अॅप निर्माता कंपन्यांवर एकतर्फी करार लादल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. त्यानंतर आता गुगलवर कारवाई करण्यात आली आहे.
आणखी वाचा - नशीब बलवत्तर म्हणून वाचले, नाहीतर खेळ खल्लास होता... पाहा Shocking Video
दरम्यान, गुगलने बाजारपेठेमध्ये स्पर्धा संपवण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला आरोप देखील करण्यात आला होता. लोकशाहीत वृत्त माध्यमांनी बजावलेली भूमिका कमी लेखता येणाप नाही. डिजिटल गेटकीपर कंपन्या त्यांच्या वर्चस्वाचा दुरुपयोग करुन स्पर्धात्मक प्रक्रियेला हानी पोहचवू नये, असंही CCI ने म्हटलं आहे.