CCTV in College Toliet: हल्ली अनेकप्रकारच्या विक्षिप्त घटना आजूबाजूला घडताना दिसत आहेत. त्यातून सध्या सोशल मीडियावरूनही (CCTV College Toliet Photos) विविध घटनांचा व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. सध्या असाच एक प्रकार कॉलेजच्या आवारात घडला आहे. कॉलेजच्या टॉयलेटमध्ये (Shocking News) चक्क सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. कॉलेजमध्ये अशाप्रकारे कोणी सीसीटीव्ही कॅमेरा लावला असेल याकडे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण (Students) पसरलेले असताना धक्कादायक माहिती समोर येते आहे. नक्की असं काय घडलं की कॉलेजच्या टॉयलेटमध्ये अशाप्रकारे सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले आहे याचा जवाब मुख्याधापिकांना विचारण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा प्रकार पाहून विद्यार्थ्यांचा संताप उडाला आहे. त्यातून असा प्रकार कॉलेजच्या टॉयलेटमध्ये घडला असल्या कारणानं विद्यार्थ्यांमध्ये रोष असून हे कॅमेरे परत काढून टाकण्याचा निर्णय प्रशासनानं घ्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 


कुणी लावले सीसीटीव्ही कॅमेरे? 


उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील डीएव्ही पीजी कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे चक्क कॉलेजच्या टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे काम कॉलेज व्यवस्थापनाकडूनच करण्यात आले आहे. कॉलेजच्या टॉयलेटमध्ये सतत नळांची चोरी होते आहे त्यामुळे त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कॉलेजच्या प्रशासनानं असे सीसीटीव्ही लावले असल्याचे सांगितले आहे. 


कधी घडला हा प्रकार? 


सोमवारी कॉलेज सुरू झाल्यानंतर जेव्हा सार्वजनिक टॉयलेटमध्ये (Toliet News) विद्यार्थी गेले असता त्यांनी चक्क समोर सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे पाहिले. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. असा प्रकार पाहून विद्यार्थ्यांची शिक्षकांची गर्दी जमू लागली. त्यामुळे सगळ्यांनाच एकप्रकारे धक्का बसला. या संदर्भात विद्यार्थ्यांनी ताबडतोब व्यवस्थापकांकडे (College Management) धाव घेतली आणि याबद्दल कारवाई करण्यास सांगितले. परंतु त्यांची उडवाउडवीची उत्तर ऐकून विद्यार्थ्यांना धक्काच बसला. 


कारण काय तर... 


अशाप्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यानं आपल्या गोपनियतेचा भंद होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले त्यामुळे हा मुद्दा वर आला. त्यानंतर विद्यार्थ्यांचा वाढलेला संताप पाहून शेवटी कॅमेरे काढण्यात आले. परंतु मुख्याधापिकांचे उत्तर ऐकून विद्यार्थ्यांना धक्काच बसला. हे कॅमेरे गेटवर लावण्यास (CCTV Controversy in College Toliet) सांगितले होते परंतु तो चुकून टॉयलेटमध्ये लावण्यात आले.