CCTV Footage Viral:निर्दयतेचा कळस! कुत्र्याला दुचाकीच्यामागे बांधून फरफटत नेलं, CCTV व्हायरल
CCTV Footage Viral: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने कुत्र्याला दुचाकीच्या मागे बांधलं असून त्याला फरफटत नेतानाचा हा व्हिडिओ असून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Shocking News: देशात गेल्या काही दिवसात भटक्या कुत्र्यांच्या (Stray Dogs) हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने आता लोकांनीच कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पण हे करत असताना काही जणांकडून निर्दयतेचा कळस गाठला जात असल्याचंही पाहिला मिळतंय. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झालाय. एक व्यक्ती आपल्या दुकीच्या मागे कुत्र्याला बांधून त्याला फरफटत नेत असल्याचं दिसंतय. या घटनेची माहिती मिळताच पशूप्रेमी (Animal Lover) संस्थेच्या काही लोकांनी त्या व्यक्तीला थांबवलं आणि त्या कुत्र्याची सुटका केली. रस्त्यावरुन फरफटत नेल्याने तो कुत्रा जबर जखमी झाला.
काय आहे नेमकी घटना
उत्तरप्रदेशमधल्या (Uttar Pradesh) गाझियाबादमधल्या विजयनगर इथल्या प्रताप विहार चौकी परिसरातील ही घटना आहे. कुत्रा चार-पाच लोकांना चावल्याने त्याला दूरवर सोडण्यासाठी नेत असल्याचं त्या व्यक्तीने सांगितलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुत्रा पिसाळल्याचं सांगत या व्यक्तीने कुत्र्याला दुचाकीच्या मागे बांधलं आणि त्याला फरफटत नेलं. या घटनेची माहिती पशूप्रेमींनी पोलिसांनी दिल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे.
मुका जनावरावर निर्दयीपणे अत्याचार करणाऱ्या त्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पशूप्रेमींनी केली आहे.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ
देशात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये काही महिन्यांपूर्वी भटक्या कु्त्र्यांनी एक 8 महिन्यांच्या चिमुरडीवर हल्ला केला. मुलीचे आई-वडिल मजूर आहे. सोसायटीच्या प्रांगणात त्यांनी चिमुकलीला ठेवलं होतं आणि ते काम करतो होते. तितक्यात सोसायटीतील भटक्या कुत्र्यांनी मुलीवर हल्ला करुन तिचे अक्षरश: लचके तोडले.
गाझियाबादमध्येच गार्डनमध्ये खेळणाऱ्या एका मुलावर पीटबूल जातीच्या कुत्र्याने (Pitbull Dog) हल्ला केला होता, यात मुलाच्या चेहऱ्यावर दीडशे टाके पडले. तर लखनऊमध्ये (Lucknow) पीटबूल जातीच्या कुत्र्याने मालकीनीवरच हल्ला करत तिची हत्या केल्याची घटना घडली होती.