नवी दिल्ली : शहरातील शकरपूर येथे एक धक्कादायक घटना घडली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. पाणी पिण्याच्या बहाण्याने दोघांनी एका चार वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीच्या रडण्याच्या आणि ओरडण्याच्या आवाजाने तिची आई सावध झाली आणि तिने चपळाईने अपहरणकर्त्यांवर काहीही विचार न करता झडप टाकली. त्यानंतर दोघे फरार झालेत. हा थरारक प्रसंग सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना नवी दिल्लीतील शकरपूर येथे २१ जुलै रोजी घडली. दुपारी तीन ते साडेतीन वाजता घरासमोर दोघे दुचाकीस्वार पोहोचले. त्यांनी लहान मुलीचे अपहरण करण्याचा डाव साधला होता. मात्र, अपहरणकर्त्याच्या तावडीतून आईने आपल्या चार वर्षाच्या मुलीला सोडवले. मातेच्या धाडसामुळे अपहरणकर्त्याचा डाव फसला.



दुपारच्या सुमारास दोघे बाईकस्वार घराच्या ठिकाणी घुटमाळत होते. धाडस करुन त्यांनी पाणी पिण्याचा बहाणा केला. त्यासाठी त्यांनी घराची बेल वाजवली. पाणी हवेय असे सांगत इकडे तिकडे पाहत राहिले. पाणी पियाल्यानंतरही ते दोघे आणखी पाणी हवेय असे सांगून लहान मुलीची वाट पाहत होते. त्याचवेळी खेळण्याच्या नातात मुलगी घराच्या गेटजवळ आली. त्या मुलीची आई घरात पाणी आणण्यासाठी पुन्हा गेल्याचे कळताच एकाने चिमुकलीला उचलले आणि बाईकवर बसविले.



चार वर्षांच्या चिमुकलीला बाईकवर बसविल्यानंतर तिने जोरदार आरडा-ओरडा करत रडण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुलीच्या रडण्याचा आवाज आईच्या कानी पडतात, ती तात्काळ बाहेर आली. त्यावेळी तिला मोठा धक्का बसला. मात्र, हिम्मत करुन तिने दोघा अपहरणकर्त्यांशी दोन हात केले. तिने आपल्या मुलीची सुटका केली. त्याचवेळी बाईकस्वार पळून जात होते. त्यावेळी शेजाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.


दुसऱ्या एकाने आपल्या दिशेने एक बाईकस्वार येताना दिसला त्यावेळी स्वत:ची स्कूटर रस्त्याच्यामध्ये लावून अपहरणकर्त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या बाईकला धक्का मारला. बाईक पडल्यानंतर तो पळून जात होता. त्यावेळी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दुसराही अपहरणकर्ता तेथे पोहोचला. मात्र, दुसऱ्या एका शेजाऱ्यांने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि दोघे अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी झाले.