नवी  दिल्ली : देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूच्या कुन्नूर जिल्ह्यात अपघात झाला. कुन्नूर येथून वेलिंग्टनला जात असताना त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमध्ये 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भीषण अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. इन्स्ट्रुमेंटल मीट्रियोलॉजिकल कंडिशन(IMC)मुळे या हेलिकॉप्टरचा अपघात झाला असल्याचा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.


बहुतांश अपघात हे आयएमसीमुळे होतात. खरं तर, रावत ज्या हेलिकॉप्टरने प्रवास करीत होते ते, अत्याधुनिक आणि सुरक्षित मानलं जातं. या हेलिकॉप्टरचा वापर जगभरातील अनेक देश करतात. 


एमआय 17 व्ही5 या अत्याधुनिक हेलिकॉप्टरमध्ये हवामान रडार आणि ऑटोपायलट सिस्टिम असते. मात्र तरीही दाट धुक्यातून उड्डाण करताना हेलिकॉप्टरला प्रवास करणे कठीण होते.


सर्वच प्रकारच्या फ्लाईटमध्ये आयएमसी यंत्रणा असते. ही यंत्रणा हवामानाचा अंदाज पायलटला देत असते. पायलट पुढील प्रवासाची दिशा ठरवण्यासाठी आयएमसीचा आधार घेतात. ह अंधारात या यंत्रणेचा पायलटला खूप उपयोग होतो. 


बिपीन रावत हे एमआय 17व्ही5 या हेलिकॉप्टरने प्रवास करीत होते. हे हेलिकॉप्टर खराब वातावरणातही उड्डाण करू शकतं.


परंतू तज्ज्ञांच्या अंदाजानुसार धुक्यात हेलिकॉप्टर भरकटलं असावं दरम्यान ते झाडाला धडकले असण्याची शक्यता आहे. हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्याआधारे तपासातून घटनेविषयी माहिती समोर येऊ शकते.