नवी दिल्ली: भारतीय लष्कर हे नेहमीच राजकारणापासून लांब राहते. आम्ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या आदेशानुसार काम करतो, असे वक्तव्य देशाचे संरक्षणप्रमुख (चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ) बिपीन रावत यांनी केले. संरक्षणप्रमुख पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बुधवारी त्यांनी दिल्लीत प्रथमच प्रसारमाध्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लष्करप्रमुखांनी आम्हाला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये'


बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्यांना लक्ष्य केले होते. लोकांना चुकीच्या दिशेने घेऊन जाणारे हे नेते नसतात. आपण सध्या शहरांमध्ये विद्यापीठ, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांची हिंसक आंदोलने पाहत आहोत. पण ते हिंसा आणि जाळपोळ करण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्त्व करत आहेत. याला नेतृत्त्व म्हणत नाहीत, अशी टिप्पणी बिपीन रावत यांनी केली होती. यानंतर विरोधकांकडून बिपीन रावत यांच्यावर टीका करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बिपीन रावत यांचे आजचे वक्तव्य सूचक मानले जात आहे. 



दरम्यान, बिपीन रावत यांनी आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट करताना म्हटले की, तिन्ही दलातील समन्वय आणि एकात्मता वाढवण्यावर आमचा भर असेल. ही तिन्ही दले एखाद्या संघाप्रमाणे काम करतील. सीडीएस या तिन्ही दलांवर नियंत्रण ठेवेल पण कोणतीही कृती करण्याचा निर्णय एकत्रपणे घेतला जाईल, असे बिपीन रावत यांनी सांगितले.  


लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या 'राजकीय' वक्तव्यावर ओवेसींचा निशाणा