श्रीनगर : पाकिस्तानकडून पूंछच्या कृष्णा घाटी आणि मेंढरमध्ये फायरिंग करण्यात आली. भारताने ही याला जोरदार प्रत्त्यूतर दिलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारताकडून दिलेल्या प्रत्त्यूतरात 3 ते 4 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत तर काही जखमी झाले आहेत. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या 3 चौक्या देखील उद्धवस्त केल्या आहेत. पाकिस्तानच्या नापाक हरकती पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत.


पुंछ भागात मागील 24 तासापासून गोळीबार सुरु आहे. देवा गावाच्या जवळ हे पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. पाकिस्तान तेथून फायरिंग करत होता त्याचा शोध घेऊन भारतीय जवानांनी त्या पोस्ट उद्धवस्त केल्या आहेत.