पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक महिला जखमी
पाकिस्तानच्या सेनेने शुक्रवारी उशिरा रात्री जम्मू कश्मीरमधीलपुंछ सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. भारतीय जवानांनी कोणतीही हरकत नाही केली तरी पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत असतो. या गोळीबारात शाहपूर केरनी भागातील एक महिला जखमी झाली आहे.
श्रीनगर : पाकिस्तानच्या सेनेने शुक्रवारी उशिरा रात्री जम्मू कश्मीरमधीलपुंछ सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. भारतीय जवानांनी कोणतीही हरकत नाही केली तरी पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत असतो. या गोळीबारात शाहपूर केरनी भागातील एक महिला जखमी झाली आहे.
लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनेंट कर्नल मनीष मेहता यांनी सांगितलं की, 'पाकिस्ताकडून रात्री ११ वाजता पुंछ सेक्टरमध्ये गाळीबार करण्यात आला. तर भारतीय जवानांनी देखील त्यांनी जशाच तसं उत्तर दिलं.'
बुधवारी देखील पाकिस्तानकडून पुंछ जिल्ह्यातल्या अग्रीम क्षेत्रामध्ये गोळीबार केला होता. ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. बीएसएफच्या एक जवानासह ४ जण यामध्ये जखमी देखील झाले होते. तर भारताने प्रत्त्यूतर देतांना पाकिस्तानच्या ५ जवानांना ठार केलं होतं. ६ ते ७ जवान जखमी केले होते.