नवी दिल्ली: विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी)  देशभरातील विद्यापीठांना २९ सप्टेंबर हा दिवस 'सर्जिकल डे' म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. यादिवशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी भारतीय लष्कराशी कटिबद्ध राहण्याची शपथही द्यावी, असे युजीसीने शिक्षणसंस्थांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. यादिवशी राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी (एनसीसी) विशेष संचलनही करावे, असे युजीसीने म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिवशी सशस्त्र दलांतील जवानांच्या बलिदानाबाबत माजी सैनिकांचे संवाद सत्र, विशेष परेड, प्रदर्शनांचे आयोजन तसेच सशस्त्र दलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शुभेच्छा पत्रे पाठवण्यात यावीत, असेही युजीसीने आपल्या आदेशात म्हटले आहे. युजीसीने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना गुरुवारी पत्र पाठवले. 


दिल्लीतील राजपथावरील इंडिया गेटजवळ २९ सप्टेंबर रोजी एक दृकश्राव्य प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात येणार आहे. याच धर्तीवर राज्ये, केंद्रशासित प्रदेश, महत्वाची शहरे, देशातील लष्करी छावण्यांमध्ये देखील प्रदर्शने भरवली जातील. ही प्रदर्शने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारी असावीत असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.