Central government employees Diwali Bonus : दिवाळी (Diwali 2023) साठी आता अवघे काही दिवस उरलेले असतानाच अनेकांना वेध लागले आहेत ते म्हणजे या सणाच्या धर्तीवर मिळणाऱ्या दिवाळी बोनसचे. अर्थात दिवाळीच्या निमित्तानं खात्यात येणाऱ्या पगारेतर रकमेचे. दिवाळी बोनस म्हटलं की सरकारी कर्मचारीच नजरेसमोर येतात. कारण, या मंडळींना मिळणारा बोनस पाहता खरी दिवाळी यांचीच, हीच प्रतिक्रिया दिली जाते. किंबहुना ही प्रतिक्रिया गैर नाही. कारण, नुकताच शासनानं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Diwali Bonus ची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2022 आणि 23 साठी नॉन गॅजेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारी नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनसची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये दोन्ही गटांतील गॅजेटेड कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या पगाराच्या बरोबरीनं बोनची रक्कम दिली जाणार आहे. 


हेसुद्धा वाचा : यंदाचा हिवाळा नावापुरताच? उकाड्याशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा, हवामान विभागाचा इशारा 


Diwali Bonus चा लाभ कोणाला? 


उपलब्ध माहितीनुसार ग्रुप B आणि ग्रुप C मध्ये मोडणाऱ्या non-gazetted employees नासुद्धा हा बोनस देण्यात येणार आहे. हे तेच कर्मचारी आहेत जे कोणत्याही प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस स्कीममध्ये मोडत नाहीत. केंद्राकडून देण्यात येणाऱ्या Adhoc Bonus चा फायदा केंद्रीय अर्धसैनिक दलांना म्हणजेच paramilitary forces साठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मिळतो. शिवाय या बोनसचा फायदा कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. 


बोनसचं गणित समजून घेताना... 


कर्मचाऱ्यांतं सरासरी वेतन आणि गणनेच्या सर्वाधिक वेतन सीमेनुसार जो आकडा कमी असेल त्यानुसार बोनस ठरतो. 30 दिवसांचा मासिक बोनस साधारण महिन्याभराच्या वेतनाइतका असतो. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याला 18000 रुपये मासिक वेतन आहे तर त्याचा मासिक बोनस 17763 इतका आहे. 31 मार्च 2023 पर्यंत सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या बोनसचा फायदा मिळणार आहे. 2022- 23 दरम्यान किमान सहा महिने सलग काम केलेल्या कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळणार आहे.