8 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कामाच्या योजना; चांगली कमाई आणि रोजगाराचीही संधी
जर तुमचे शिक्षण कमी असेल आणि नोकरी किंवा स्वयंरोजगाराच्या शोधात असाल तर, केंद्र सरकारकडे अनेक योजना आहेत.
नवी दिल्ली : जर तुमचे शिक्षण कमी असेल आणि नोकरीच्या शोधात असाल तर, केंद्र सरकारकडे अनेक योजना आहेत. जेथे 8 वी ते 12 वी उत्तीर्ण उमेदवार लाभ घेऊ शकतात. या योजनांच्या मदतीने तुम्ही तुमचे स्वतःचे काम सुरू करू शकता. आणि नोकरी देखील करू शकता.
पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळते. यामाध्यमातून तुम्ही आपला स्वयंरोजगार सुरू करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
पीएम कौशल्य विकास योजना
केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत उमेदवारांना कौशल्य विकासाची ट्रेनिंग दिली जाते. ही ट्रेनिंग घेऊन तुम्ही आपला बिझनेस सुरू करू शकता. किंवा कौशल्य शिकून रोजगार/नोकरी मिळवू शकता.
मनरेगा योजना
ही योजना प्रति कुंटूंब प्रति वर्ष 100 दिवसांचा किमान रोजगार दिला जाण्याची गॅरंटी देते. या योजनेअंतर्गत अर्ज देण्यासाठी 15 दिवसांमध्ये तुम्हाला काम मिळण्याचा अधिकार मिळतो.
पीएम रोजगार सृजन कार्यक्रम
या योजनेअंतर्गत विनिर्माण क्षेत्रात स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी सरकारकडून 10 रुपये आणि व्यापार सेवा क्षेत्रात काम करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. यासाठी उमेदवार कमीत कमी 8वी उत्तीर्ण असायला हवा
दीन दयाळ उपाध्याय ग्रामीन कौशल्य योजना
या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण युवकांना कौशल्य शिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी तयार करणे.