तुमच्या PFमधून अडचणीत पैसे घेण्याची ही सुविधा तुम्हाला माहित आहे का?
आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देखील लोकांवरती अर्थिक बोजा वाढत आहे.
मुंबई : कोरोनाने देशात हाहाकार माजवला होता. ज्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन लावले गेले होते. परंतू यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांचा पगात कपात केला गेला. ज्यामुळे लोकांना त्यांचे खर्च भगवणे अशक्य होऊ लागले. त्यामुळे लोकांवर कर्ज घेण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत सरकारने लोकांसाठी एक योजना सुरु केली होती, ज्यामु्ळे लोकं त्यांच्या पीएफ खात्यातून अॅडव्हान्स पैसे घेऊ शकतात.
लोकांना त्याच्या पीएफ खात्याचे फायदे काय आहेत? याची माहिती नसल्याने, ते त्याचा फायदा घेऊ शकत नाही. परंतु यामाहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. ज्यामुळे तुम्ही कर्ज बाजारी होण्यापासून वाचू शकता.
आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देखील लोकांवरती अर्थिक बोजा वाढत आहे, त्यामुळी सध्याची परिस्थिती लक्षात घेता. सरकारने पुन्हा एकदा पीएफ खात्यातून अॅडव्हान्स पैसे घेण्याची योजना सुरु केली आहे.
पीएफ अॅडव्हान्स पैसे काढण्याची सुविधा दुसऱ्यांदा उपलब्ध
कोरोनाची दुसरी लाटचे वस्तूस्थिती लक्षात घेता ईपीएफओने पुन्हा एकदा आपल्या कोट्यावधी खातेदारांना दिलासा दिला आहे. ईपीएफओने कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा त्यांच्या पीएफमधून आगाऊ रक्कम काढण्याची सुविधा दिली आहे. मागील वर्षी मार्चच्या सुरुवातीला, ईपीएफओने आपल्या ग्राहकांना हा दिलासा दिला होता. ज्यामध्ये कर्मचारी त्यांच्या पीएफमधील पैसे अॅडव्हान्समध्ये काढून घेऊ शकतात. ही काढलेली रक्कम परत करण्याची ही गरज नाही. त्यांनी काढलेली रक्कम त्यांच्या पीएफमधून वजा केली जाईल. ज्यामुळे तुम्हाला बाहेरुन कर्ज घेण्याची गरज भासणार नाही.
कोरोना साथीच्या दुसर्या लाटे दरम्यान, ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) चे 6 कोटी खातेदारांना जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत चांगली बातमी मिळवणार आहेत. जुलै महिन्यात ग्राहकांच्या पीएफ खात्यात मोठी रक्कम येणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था अर्थात ईपीएफओ (EPFO) 8.5% व्याज ग्राहकांच्या खात्यात आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये हस्तांतरित करू शकते, यासाठी सरकारकडून मान्यता मिळाली आहे.
जुलैच्या अखेरीस 8.5% व्याज मिळेल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाच्या मंजुरीनंतर, 8.5% व्याज रक्कम जुलै अखेरपर्यंत ईपीएफओ ग्राहकांच्या खात्यात जमा होईल. मंत्रालयाच्या मंजुरीनंतर लवकरच ट्रांसफरची प्रक्रिया सुरू केली जाईल. यापूर्वी, मागील आर्थिक वर्षात 2019-20 मध्येही केवायसीमधील गडबडीमुळे अनेक ग्राहकांना व्याज मिळण्यासाठी 8 ते 10 महिन्यांपेक्षा जास्त काळ थांबावे लागले. देशातील 6.44 कोटी लोक या पीएफच्या योजनेत येतात.