सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई  : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona) लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाचा वाढता जोर पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. मुंबईतला दैनदिंन रुग्णांचा आकडा वाढताना दिसत असताना पालिकेनेही आदेश दिले. दरम्यान आता केंद्र सरकारने राज्य सरकारला कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येंच्या पार्श्वभूमीवर पत्र पाठवलं आहे. या पत्राद्वारे केंद्राने राज्याला कोरोनाला रोखण्यासंदर्भात महत्त्वाचे आदेश दिले आहेत. (central government sent letter to maharashtra government on corona patients incresing in state and about alretness of dangerous virus)


केंद्राच्या पत्रात काय म्हटलंय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र पाठवलं आहे. कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र आरोग्य विभागाचे राज्य सरकारला पत्र पाठवण्यात आलंय. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचं या पत्रात नमूद केलंय. 


मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही चिंताजनक असल्याचं केंद्राने म्हटलंय. 


या जिल्ह्यामंध्ये टेस्टिंग आणि लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात यावा, याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नवीन कोरोना व्हेरियंट यावर लक्ष द्यावे, असेही निर्देश दिले गेले आहेत.


अ‍ॅक्टीव्ह रुग्णांमध्येही वाढ


राज्यात16 एप्रिलला सर्वात कमी 626 सक्रिय रुग्णसंख्या होती. मात्र गेल्या 45-50 दिवसांमध्ये रुग्णसंख्येत 7 पटीने वाढ झाली. त्यामुळे हा आकडा 4 हजार 500  वर गेला आहे. तसेच  मुंबई, ठाणे, पुणे तसंच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या 97 टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट हा 7 टक्के आहे.