नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारडून महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी समोर येत  आहे.  केंद्र सरकारचा महाराष्ट्राला जीएसटी परतावा जाहीर करण्यात आलायं. जीएसटी परताव्याचे महाराष्ट्राला १९ हजार २३३ कोटी रूपये देण्यात येत आहेत. २०१९-२० चा हा जीएसटी परतावा देण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात सर्वाधिक मदत महाराष्ट्राला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण १ लाख ६५ हजार कोटींचा परतावा देण्यात आलाय. केंद्राकडून आलेल्या परिपत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन कोरोना संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांसंदर्भात माहिती दिलीय. यामध्ये महाराष्ट्र, युपी आणि बंगालमध्ये टेस्टिंग क्षमता १० हजारांनी वाढवत असल्याचे ते म्हणाले. 



पंतप्रधानांच्या ट्वीटमधील महत्वाचे मुद्दे 


आयसोलेशन सेंटर, कोविड स्पेशल हॉस्पिटल, टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रॅकिंगशी संबंधित जोडलेले नेटवर्क अशा क्षेत्रात भारताने आपल्या क्षमतेचा विस्तार केला. 


आज भारतामध्ये ११ हजाराहून जास्त कोविड फॅसिलीटी आहेत. ११ लाखाहून जास्त आयसोलेशन बेड आहेत. जानेवारीमध्ये कोरोनासाठी एक टेस्ट सेंटर होते.. आज १३०० लॅब्स पूर्ण देशामध्ये कार्यरत आहेत. तसेच भारतात ५ लाखाहून अधिक टेस्ट दररोज होत असल्याचे ते म्हणाले. 


भारतीयांना वाचविणे हे एकच उद्देश प्रत्येक भारतीयाचा होता. याचे सकारात्मक परिणाम दिसले. पीपीई किट, मास्क आणि टेस्ट किटमध्ये भारत यशस्वी आहे. 


६ महिन्यांपुर्वी देशात पीपीई किट बनत नव्हते. पण आज १२०० हून अधिक उत्पादक दररोज ५ लाखाहून अधिक पीपीई किट बनवत आहेत. 


एक वेळ अशी होती जेव्हा एन ९५ मास्क बाहेरुन घ्यावे लागत होते. पण आता भारतात ३ लाखाहून अधिक एन ९५ मास्क दररोज बनतात. 


मानवी साखळी तयार करण्याचं मोठं आव्हान होतं. पण पॅरामेडिकल, आशा वर्कर, अंगणवाडी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण अभुतपूर्व आहे. 


कोरोनाच्या वॅक्सिनसाठी आपल्या देशात जोरदार प्रयत्न सुरु आहेत. जोपर्यंत वॅक्सिन बनत नाही तोपर्यंत मास्क आणि सुरक्षित अंतर गरजेच असल्याचे ते म्हणाले.