नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी देशासाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यानुसार अत्यल्प गटासाठी ३ महिने १ किलो डाळ मोफत मिळणार आहे. प्रत्येक गरीबाला ३ महिने ५ किलो अन्नधान्य मोफत देण्यात येण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच संघटीत क्षेत्रातील कामगारांचा भविष्य निर्वाह निधी पुढचे ३ महिने सरकारतर्फे भरला जाणार आहे. ज्यांचा पगार १५ हजारपेक्षा कमी आहे अशा कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी यात भरला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६३ लाख महिला स्वयंसेवक समुहांना २० लाखापर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. संघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांच्या पगारानुसार पीएफ सरकारतर्फे भरला जाणार आहे. 



अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या भारत देशातील प्रत्येत नागरिकासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये अर्थमंत्र्यांनी गरीब जनतेला प्राधान्य देत त्यांच्यासाठी अतीव महत्त्वाच्या घोषणा करत अन्नधान्य पुरवठा आणि वित्तीय तुटवड्याची झळ या वर्गाला बसणार नाही याची काळजी घेतली. 


देशभरातील जनतेसाठी तब्बल १ लाख ७० हजार कोटी रुपयांची मोठी रक्कम विविध योजनांअंतर्गत या संघर्षाच्या काळात देशहितासाठी वापरण्यात येणार आहे. ज्यामध्ये महिला, विधवा, दिव्यांग, अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरवणारे कर्मचारी या सर्वांची काळजी केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे. देशभरात लॉकडाऊन डाहीर केल्यानंतर सर्वतोपरींनी कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे. त्यातच सीतारमण यांनी केलल्या या सर्व घोषणा पाहता देशातील एक मोठा वर्ग असणाऱ्या गरीब वर्ग आणि शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.


महत्वाच्या घोषणा 


-केंद्र सरकारकडून गरिबांसाठी १ लाख ७० हजार कोटी रुपयांचं पॅकेज. कष्टकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा. 


-प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची घोषणा


-आरोग्य सेवेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला ५० लाखांचा आरोग्य विमा. २० लाख कर्मचाऱ्यांना मिळणार इंशुरन्सची सेवा 


-प्रत्येक गरिबाला ३ महिने ५ किलो अन्नधान्य मोफत. गरिबांच्या खात्यात थेट पैसे जाणार. अर्थमंत्र्यांची घोषणा


-शेतकऱ्यांना महिना २ हजार रुपयांची मदत 


-मनरेगाच्या ५ कोटी मजुरांना योजनेचा लाभ