मुंबई : इतर मागासवर्गीय वर्गासाठी केंद्र सरकारने आज खुषखबर दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता ओबीसी आरक्षणासाठी क्रिमिलेअरची मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आहे. वार्षिक उत्पन्न आठ लाख रूपये असणार्‍यांचा समावेश ओबीसी क्रिमिलेअर अंतर्गत करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली आहे. यापूर्वी ही उत्त्पन्न मर्यादा ६ लाख होती. आता उत्पन्न मर्यादेमध्ये वाढ झाल्याने अनेकाांना आर्थिक फायदा घेता येईल. 



 सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षणाचा फायदा घेता येईल.
 
ओबीसींची उपसूची बनवण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात यावी, अशी शिफारस राष्ट्रपतींकडे पाठवली आहे. यामध्ये या लाभापासून वंचित राहणाऱ्या लोकांचाही समावेश केला जाईल, असेही जेटलींनी नमूद केले आहे.