Remdisivir Injectionचे दर कमी करण्याचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय
रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे Remdisivir Injectionची कमतरता देखील मोठ्या प्रमाणात भासत होती.
नवी दिल्ली : देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे Remdisivir Injectionची कमतरता देखील मोठ्या प्रमाणात भासत होती.अशात कोरोना रूग्णांना दिलासा देणारा एक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता Remdisivir Injectionचं उत्पादन वाढणार असून Remdisivir Injectionचे दर कमी होणार आहेत. Injectionचे दर 2 हजार रूपयांपर्यंत कमी होतील.
देशातील 7 विविध कंपन्यांमध्ये Remdisivir Injectionचं उत्पादन होत आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमन वाढत असल्यामुळे Injectionसाठी मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे सरकारने इंजेक्शनचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला असून सामान्य नागरिकांपर्यंत इंजेक्शन पोहोचवण्याचा प्रयत्न देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे.
केंद्र सरकारने इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचे आदेश दिले आहेत. या किंमती कमी करण्यासाठी, रासायनिक खते मंत्रालय उत्पादक कंपन्यांशी मागील 2 दिवसांपासून बैठक करीत होते. अखेर इंजेक्शनच्या किंमती कमी करून उत्पादन वाढवण्यात येणार आहे.