उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर अहमद फारुकी यांनी अयोध्या वादावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार केला आहे. या निर्णयावर कोणतीही पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याचवेळी मुस्लिमांना पर्यायी जागा देण्याचा निर्णयही न्यायालयाने दिला आहे. तर, मुस्लीम समुदायाला स्वतंत्र जमीन देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 


अयोध्या वादावरील निर्णयानंतर, सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील झफर्याब जिलानी यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आपण समाधानी नसल्याचं सांगितलं. निर्णयावर असहमती दर्शवणं आमचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्ट देखील कधी-कधी चुकीचं असू शकतं. कोर्टाने याआधीही आपल्या निर्णयांवर पुनर्विचार केला आहे. जर आमची वर्किंग कमिटी निर्णय घेईल तर आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करु, असं ते म्हणाले होते.


  


मात्र, उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर अहमद फारुकी यांनी सांगितलं की, अयोध्या वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असं आधी सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता पुनर्विचार याचिका दाखल करणार नसून, न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करत असल्याचं ते म्हणाले.