Chanakya Niti for Successful Life: चाणक्य नीतिमध्ये व्यावहारिक जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचं आजही महत्त्व आहे. या गोष्टींचा अवलंब केल्यास अनेक समस्या आणि संकटे टळू शकतात. आज आपण चाणक्य नीतिमध्ये उल्लेख केलेल्या अशा लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यापासून दूर राहणे आपल्यासाठी चांगले आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, अशा लोकांसोबत कधीही राहू नका कारण ते तुम्हाला कधीही फसवू शकतात. आचार्य चाणक्य हे महान अर्थतज्ज्ञ आणि मार्गदर्शक होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आचार्य चाणक्य म्हणतात की, जर तुम्हाला आनंदी-यशस्वी जीवन जगायचे असेल आणि स्वतःला संकटांपासून लांब ठेवायचं असेल तर काही लोकांपासून दूर राहणे गरजेचं आहे. जाणून घेऊयात चाणक्य नीतिमध्ये कोणत्या लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


जास्त गोड बोलणारे लोकं: जे लोक नेहमी गरजेपेक्षा जास्त गोड बोलतात आणि विनाकारण तुमची स्तुती करतात, अशा लोकांपासून सावध राहा. असे लोकं कोणाची फसवणूक करण्यास मागे पुढे पाहात नाही. अशा लोकांपासून नेहमी दूर राहा.


शब्दाला पक्के नसणारे लोकं: जी लोकं नेहमी मोठी आश्वासने देतात परंतु कोणतेही वचन पूर्ण करत नाहीत, अशा व्यक्तींपासून दूर राहा. अशी लोकं तुमच्या कधीच उपयोगी  पडणार नाहीत, उलट अडचणीच्या वेळी तुमची साथ सोडतील.


विश्वासघातकी लोकं: अशी लोकं ओळखणे थोडे कठीण आहे कारण ते तुमच्या समोर तुमच्या शुभचिंतकासारखे वागतात पण तुमचे नुकसान करण्यात आणि तुमच्या मागे तुमची प्रतिमा खराब करण्यात व्यस्त असतात. अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून ताबडतोब अंतर ठेवा.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)