चंद्राबाबू नायडूंच्या कुटुंबाला 8700000000 रुपयांची लॉटरी, पत्नी मालामाल; पाच दिवसांत कशी वाढली इतकी संपत्ती?
Chandrababu Naidu : सत्तास्थापनेच्या वाऱ्यांनी वेग धरला असून, आता त्यामध्ये चर्चेत असणारं एक नाव म्हणजे चंद्राबाबू नायडू. दक्षिणेतील राजकारणातलं हे एक मोठं नाव...
Chandrababu Naidu Family Wealth : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election results 2024) निकाल जाहीर झाल्यानंतर एकाच चर्चेनं देशभरात जोर धरला आणि सत्तास्थापनेच्या समीकरणाची बहुविध रुपं सर्वांनाच पाहायला मिळाली. यामध्ये एक नाव बरंच चर्चेत आलं आणि ते नाव म्हणजे दक्षिणेच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांचं. चंद्राबाबू नायडू किंगमेकर ठरले खरे, या सत्तेत पुढं त्यांच्या वाट्याला नेमकं काय वाढून ठेवलं आहे हे येत्या काळात कळेलच. पण, त्यापूर्वी मात्र याच चंद्राबाबूंनी एका वेगळ्या कारणानं सर्वांचं लक्ष वेधलं आणि ते कारण म्हणजे त्यांच्या कुटुंबाला झालेला धनलाभ.
अवघ्या 5 दिवसांच्या कालावधीत नायडू कुटुंबाला 870 कुटुंबाचा गडगंज नफा झाला असून, कुटुंबाच्या एकूण संपत्तीचा आकडाही मोठ्या फरकानं वाढला आहे. नायडू कुटुंबाला हेरिटेज फूड्सच्या शेअरच्या माध्यमातून हा नफा झाला असून, या शेअरला 55 टक्क्यांनी उसळी मिळाल्यामुळं ही किमया झाल्याचं सांगण्यात येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार नायडू कुटुंबीय या कंपनीचे प्रमोटर आहेत. त्यातच सध्याच्या आंध्र प्रदेश विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालांमुळं त्यांचं चर्चेत येणारं नाव आणि सत्तास्थापनेतील त्यांची भूमिका पाहता हेरिटेज फूड्स कंपनीच्या शेअरची किंमत एकाएकी वाढली. दूध आणि अन्य दुग्धजन्य उत्पादनांची विक्री करणाऱ्या या कंपनीकडून पनीर, दूध, तूप, फ्लेवर्ड मिल्क, इम्यूनिटी मिल्क या आणि अशा इतर उत्पादनांचाही समावेश आहे. भारतातील 11 राज्यांमध्ये जवळपास 15 लाख कुटुंबांकडे हेरिटेड फूड्सच्या उत्पादनांचा वापर केला जातो असं अहवालातून समोर आलं आहे. या साऱ्याचा थेट फायदा सध्या शेअरला मिळालेल्या दराच्या स्वरुपात पाहता येत आहे.
कशी वाढली शेअरची रक्कम?
3 जून रोजी शेअरची किंमत 424 रुपये इतकी होती. ज्यानंतर या शेअरनं तब्बल 55 टक्क्यांनी उसळी घेतली. एक्झिट पोलनंतर तेलुगू देसम पार्टी अर्थात टीडीपीच्या वाट्याला येणारं अपेक्षित यश पाहता शुक्रवारपासूनच या शेअरची किंमत 661.25 रुपयांवर पोहोचली आणि सर्वात उच्चांकी दरावर बंद थांबली. ज्यामुळं चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबाच्या एकूण मिळकतीत कमालीची भर पडल्याचं पाहायला मिळालं.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather updates : सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश; वीकेंडला राज्याच्या 'या' भागात मान्सूनची हजेरी
निवडणुकीचे परिणाम...
लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं हेरिटेज फूड्सच्या शेअर मार्केट व्हॅल्यूमध्ये तब्बल 2400 कोटी रुपयांची वाढ झाली. या कंपनीची मार्केटच व्हॅल्यू 7 जून रोजी 6136 कोटी रुपयांवर पोहोचली असून, साधारण आठवड्याभरापूर्वी हेच आकडे 3700 च्या घरात होते. शेअर मार्केट तज्ज्ञांच्या अहवालानुसार नायडू यांच्या कुटुंबाकडे या कंपनीचे एकूण 35.7 टक्के शेअर आहेत.
नातवापासून पत्नीपर्यंत सर्वजण शेअरहोल्डर
चंद्रबाबू नायडू यांची पत्नी, भुवनेश्वरी यांच्याकडे कुटुंबातील सर्वाधिक शेअर असून, त्या 24.37 टक्के शेअरच्या भागिदार आहेत. तर, नायडू यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे अनुक्रमे 10.82 आणि 0.46 टक्के शेअर आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे नायडूंच्या नातवाकडेही कंपनीच्या 0.06 टक्के शेअरची भागिदारी आहे. शेअरची आकडेवारी पाहता कुटुंबाच्या एकूण कमाईची आकडेवारी आठवड्याभरापूर्वी 1319 रुपये इतकी होती. ज्यानंतर त्यात वाढ होऊन हा आकडा 2190 कोटींवर पोहोचला आहे. म्हणजेच एकूण कमाईत थेट 870 कोटींचा निव्वळ नफा. कमालच म्हणावी ना!!!