Chandrayaan-3:  चांद्रयान-3 चं चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग नियोजित वेळेनुसारच होणार असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली. चांद्रयान-3 च्या लँडिंगसाठी आता अवघे ताहीच उरले असून लँडिगचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. संपूर्ण जागाचे लक्ष भारताच्या चांद्रयान-3  मोहिकडे लागले आहे. ज्या वेळेस चांद्रयान-3 चंद्रावर लँंडिग करेल तो क्षण भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असणार आहे. चांद्रयान-3 मोहिमेसोबतच चांद्रयान-2 मोहिमेची देखील चर्चा होत आहे. चांद्रयान- 2 च्या लँडिंग अपयशी ठरले पण ही मोहिम यशस्वी झाली आहे असं म्हणण्यास हरकरत नाही. कारण, चांद्रयान 2 च्या मदतीनेच चांद्रयान 3 चंद्रावर उतरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 ऑगस्टला  संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. यासाठी नियमित चाचण्या सुरु आहे. चांद्रयानाचा प्रवास सुरळीत सुरु आहे अशी अपडेट इस्रोकडून देण्यात आली आहे. लँडिंगच्या वेळेस चंद्रावरचं वातावरण जर लँडिंगसाठी योग्य नसेल तर चांद्रयानाची सॉफ्ट लँडिंग 27 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात येईल, त्यासाठी अखेरची 15 मिनिटं अत्यंत महत्त्वाची असतील, असं इस्रोकडून यापूर्वी सांगण्यात आलं होतं. मात्र आता नियोजित वेळेनुसारच चांद्रयानाचं लँडिंग होईल असं इस्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 


चांद्रयान 2 ने केले चांद्रयान 3 चे स्वागत


चांद्रयान 3 चा चांद्रयान 2 शी संपर्क झालाय, इस्रोनं ट्विट करत ही माहिती दिलीय. चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरनं चांद्रयान-2 मिशनच्या ऑर्बिटरसोबत संचार लिंक अर्थात संवाद प्रस्थापित केलाय. "स्वागत आहे, मित्रा" असा संदेश चांद्रयान-2 च्या माध्यमातून पाठवण्यात आला. चांद्रयान -2 चा ऑर्बिटर 2019 पासून चंद्राच्या कक्षेत आहे.


चांद्रयान 2 च्या मदतीने यशस्वी होतेय चांद्रयान 3 मोहिम


चांद्रयान 2 च्या मदतीने चांद्रयान 3 मोहिम यशस्वी होत असल्याचे इस्रोचे माजी संचालक के सिवन यांनी सांगितले. चांद्रयान 2 च्या लँंडिग वेळी झालेल्या चुकांचा अभ्यास करुन त्यानुसार  चांद्रयान 3 मोहिमेत बदल करण्यात आले आहेत.  लँंडिग करताना मोठा दबाव पेलवता यावा याकरिता विक्रम लँडरच्या पायांची ताकद वाढवण्यात आली आहे. चांद्रयान 3 मध्योे नवे सेंसर्स लावण्यात आले आहेत.  गेल्या वेळी लँडिंग साईटचं असलेलं 500 बाय 500 मीटरचं क्षेत्रफळ यंदा 4 बाय अडीच किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आल आहे.  चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरला जास्त प्रमाणात ट्रॅकिंग, टेलिमेट्री आणि कमांड अँटिना लावण्यात आले आहेत. चूक झालीच तर विक्रम लँडर 96 मिलिसेकंदांमध्ये चूक सुधरु शकतो असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. चांद्रयान 2 मोहिमेवेळी झालेल्या चुका चांद्रयान 3 मोहिमेमध्ये सुधारण्यात आल्या आहेत.