Chandrayaan 3 Rover On Moon Video: भारताची महत्त्वकांशी चंद्रमोहीम चांद्रयान-3 चं विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर या लँडरमधील रोव्हरने कामाला सुरुवात केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोनेच विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर कसं चंद्रावर उतरलं याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तासाभरामध्ये व्हायरल झाली आहे. रोव्हर हा एखाद्या छोट्या रिमोट कंट्रोल कारसारखा चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमंती करुन माहिती गोळा करणारा रोबोट आहे असं अगदी सोप्या भाषेत म्हणता येईल. 


रोव्हरवर दिसतोय तिरंगा अन् राजमुद्रा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इस्रो'ने सकाळी 11 वाजून 1 मिनिटांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये, "लँडरमधून रोव्हर बाहेर पडला तो क्षण लँडरवरील इमेजर कॅमेराने टीपला", असा मजकूर सुरुवातीला लिहिलेला आहे. विक्रम लँडरवर असलेल्या कॅमेरातून शूट करण्यात आलेल्या या व्हिडीमध्ये लँडरमधून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी तयार केलेल्या रॅम्पवरुन प्रग्यान रोव्हर खाली उतरताना दिसत आहे. हे रोव्हर उतरताना त्याची सावलीही अगदी स्पष्ट दिसत आहे. या रोव्हरच्या चाकांवर असलेला 'इस्रो'चा लोगो आणि भारतीय राजमुद्राही व्हिडीओत स्पष्टपणे दिसतेय. रोव्हरच्या डाव्या चाकावर 'इस्रो'चा लोगो असून उजव्या चाकावर राजमुद्रा आहे. रोव्हरच्या चाकांवर 'इस्रो'च्या लोगोबरोबरच भारताची राजमुद्राही आहे. हे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर जिथून जिथून जाईल तिथं तिथं 'इस्रो'चा लोगो आणि राजमुद्रेची छाप पडले. 


नक्की वाचा >> सूर्यमालेत 1, 2 नव्हे तर तब्बल 297 चंद्र! एकच ग्रह 146 चंद्रांचा 'मालक'


14 दिवस करणार भटकंती


चंद्रावर उतरलेल्या रोव्हरच्या मागील बाजूस असलेला भारताचा राष्ट्रध्वज आणि राजमुद्राही अगदी स्पष्टपणे या व्हिडीओत दिसत आहे. अगदी सावकाश हा रोव्हर चंद्रावर उतरतो. हा रोव्हर आता पुढील 14 दिवस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वेगवेगळे प्रयोग करणार आहे. यामध्ये मातीचे नमुने तपासणे, फोटो काढणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. 



..तेव्हा तापमान -240 हून कमी होणार


पुढील 14 दिवसांमध्ये या रोव्हरच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रयोग करुन घेण्याचा भारतीय वैज्ञानिकांचा मानस आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सध्या दिवसाचा कालावधी सुरु आहे. चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवर 14 ते 15 दिवसांच्या कालावधीसाठी सूर्यप्रकाश असतो आणि तितक्याच कालावधीसाठी अंधार असतो. ज्यावेळेस या ध्रुवांवर अंधार पडतो तेव्हा तेथील तापमान प्रचंड कमी होते.



चांद्रयान-3 ज्या ठिकाणी उतरलं आहे त्या दक्षिण ध्रुवावर सूर्यप्रकाश नसतो त्या काळात तापमान उणे 240 हून खाली घसरतं. त्यामुळेच या ठिकाणी रात्र झाल्यानंतर पुन्हा चांद्रयान यामधून सुखरुप बाहेर पडून तितक्याच परिणामकारपणे काम करु शकेल की नाही याबद्दल शंका असल्याने पहिल्या 14 दिवसांमध्येच जास्तीत जास्त काम करुन घेण्याचा मानस आहे.