नवी दिल्ली : आपल्या संशोधनाने आणि नाविन्यपूर्ण मोहीमांनी अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात जगभरात ठसा उमटवल्यामुळे या क्षेत्राचं नेतृत्व निर्विवादपणे इस्त्रोकडे आलयं. 


इस्त्रोचा महिमा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्त्रोने एकापेक्षा एक मोहीमांचा धडाका लावला आहे. नुकताच इस्त्रोने २०१९ मध्ये होणाऱ्या सूर्य मोहीमेची घोषणा केली आहे. आणि आता इतिहासात पहिल्यांदाच इस्त्रो चंद्रावर आपलं अस्तित्व दाखवणार आहे.


चांद्रयान-II : इस्त्रोची ऐतिहासिक मोहीम


याआधी २०१३ मध्ये चीनने आपला रोवर (यंत्रमानव) चंद्रावर उतरवला होता. आता इस्त्रो आपला लुनार रोवर (चंद्रावर फिरू शकणारा यंत्रमानव) मार्च २०१८ मध्ये चंद्रावर उतरवण्याच्या तयारीला लागलं आहे. या मोहीमचं नाव चांद्रयान-II असं असणार आहे. 


चांद्रयान-I चं अपयश


चांद्रयान-II मोहीमचं महत्व अशासाठी कारण २००८ मध्ये चांद्रयान-I मोहीमे दरम्यान इस्त्रोच्या अंतराळयान चंद्रावर पडून नष्ट झाल्यामुळे ती मोहीम रखडली होती. त्याचे अवशेष नंतर २०१६ मध्ये नासाला सापडले होते.


काय असणार चांद्रयान-II मोहीमत 


चांद्रयान-II मोहीमेत यानाचं वजन ३२९० किलो असणार आहे. यात यानाचे मुख्यत: तीन घटक असणार आहेत. पहिला घटक चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारं यान असेल, त्याचबरोबर लुनार रोवरला चंद्रावर उतरवणारा वाहक आणि शेवटचा घटक म्हणजे लुनार रोवर (चंद्रावर फिरू शकणारा यंत्रमानव). या मोहीमतून मुख्यत: चंद्राच्या पृष्ठभागाचं आणि चंद्रावरच्या मातीचं रासायनिक विश्लेषण केलं जाणार आहे. रोवर यासंदर्भातली माहिती इस्त्रोकडे पोहोचवणार आहे. 
अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात याचं महत्व प्रचंड आहे.