मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून 'चांद्रयान २' या भारताच्या महत्त्वाकांक्षी यानाचे एप्रिल महिन्यात प्रक्षेपण करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतराळ विभागाचे प्रमुख जितेंद्र सिंग यांनीही ही माहिती दिलीय. भारताची ही दुसरी चांद्रमोहीम असून यासाठी आठशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 


आजवर फारसे संशोधन न झालेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील प्रदेशात ते उतरवण्याचे उद्दिष्ट असल्याचे इस्रोचे नवनियुक्त अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितलंय.


चांद्रयान-१ ने चंद्रावरील पाण्याचा शोध लावला होता. दुसरी मोहीम त्यापुढील संशोधनाच्या उद्देशाने आखली आहे.


चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणासाठी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान योग्य कालावधी आहे. एप्रिलमधील प्रक्षेपण यशस्वी झाले नाही तर नोव्हेंबरमध्ये पुन्हा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती सिवन यांनी दिलीय.