जॉब बदलल्याने एकापेक्षा जास्त EPF अकाउंट झालेत! मर्ज करा नाही तर...
UAN नंबर एकच असला तरी एकापेक्षा जास्त EPF अकाउंट तयार होतात. हे ईपीएफ अकाउंट मर्ज करणं आवश्यक आहे.
Employee Provident Fund UAN: नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला भविष्य निर्वाह निधी मंडळाकडून यूएएन नंबर दिला जातो. यूएएन नंबरवरून ईपीएफओच्या वेबसाईवरून पीएफ अकाउंटची सर्व माहिती मिळते. पण चांगल्या पगार आणि पोस्टची ऑफर आल्यानंतर अनेक जण नोकरी बदलतात. त्यामुळे UAN नंबर एकच असला तरी एकापेक्षा जास्त EPF अकाउंट तयार होतात. हे ईपीएफ अकाउंट मर्ज करणं आवश्यक आहे. जेव्हा तुमची नवीन कंपनीत निवड होते तेव्हा कंपनी यूएएन नंबर मागते. या नंबरद्वारे कंपनी नवीन अकाउंट क्रिएट करते. त्यानंतर पगारातील काही भाग पीएफ खात्यात जमा होण्यास सुरुवात होते. पण जेव्हा तुमचं नवं ईपीएफ अकाउंट तयार होतं. तेव्हा यूएएन नंबरच्या आधारे जुनं अकाउंट मर्ज करू शकता. यामुळे जुन्या अकाउंटमधील सर्व पैसे नव्या अकाउंटमध्ये जमा होतात.
मर्ज करणं का आवश्यक आहे?
दोन किंवा त्यापेक्षा जास्त ईपीएफ अकाउंट असल्यास टॅक्सच्या दृष्टीकोनातून मर्ज करणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ईपीएफ खात्यातून पैसे काढता तेव्हा पाच वर्षांची मर्यादा पाहिली जाते. कॉन्ट्रिब्यूशन कधीपासून सुरु झालं आहे. जर तुम्ही पाच वर्षांआधीच पैसे काढण्याचा निर्णय घेतला तर त्यावर टॅक्स भरावा लागतो.
आता भारताच्या Facebook प्रमुखांचा राजीनामा, पाहा काय सांगितलं कारण
दोन पेक्षा जास्त EPF Account कसे लिंक कराल?
EPFO च्या मेंबर सेवा पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in वर जा
'Online Services' टॅबच्या आत 'One Member - One EPF Account (Transfer Request)' ऑप्शन सिलेक्ट करा.
तुमचे पर्सनल डिटेल्स स्क्रीनवर दिसतील. यामध्ये तुमच्या करंट कंपनीने तयार केलेले नवीन खाते दिसेल.
नवीन खात्याशी जुने खाते लिंक करताना जुन्या किंवा नव्या कंपनीकडून अटेस्ट करून घ्यावे लागेल. नव्या कंपनीकडून करणे चांगले ठरेल. तुमचा जुना मेंबर आयडी, जुना पीएफ खाते क्रमांक आणि जुना UAN प्रविष्ट करा आणि नंतर 'Get Details' वर क्लिक करा.
'Get OTP' वर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तिथे टाकून सबमिट करा. तुमची रिक्वेस्ट सबमिट होईल. आता तुमच्या करंट इंम्प्लॉयरला अप्रूव्ह करावं लागेल. यानंतर जुनं आणि नवं अकाउंट मर्ज होईल.