Bacchu Kadu : बच्चू कडू यांच्या मोकाट कुत्र्यांच्या विधानावरुन आसाम विधानसभेत गोंधळ, विरोधकांचा सभात्याग
Bacchu Kadu : महाराष्ट्रातील मोकाट कुत्र्यांच्या विधानावरुन आसाम विधानसभेत गोंधळ पाहायला मिळाला. (Political News) या प्रश्नावर चांगलाच गोंधळ झाला. याप्रश्नावरुन विरोधकांनी सभात्याग केला. प्रहार संघटनेचे प्रमुख आणि अपक्ष आमदार यांनी भटक्या कुत्र्यांवरुन एक विधान केले होते. त्यावरुन आसाम विधानसभेत गोंधळ झाला.
Bacchu Kadu : महाराष्ट्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. लहान मुलांवर हल्ल्याचा प्रकार वाढीला लागला आहे. (Political News) अनेकांना कुत्र्यांनी जखमी केले आहे. तर कांहींच्या जीवार बेतले आहे. त्यामुळे अशा कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. (Maharashtra Assembly) आमदार बच्चू कडू यांनी यावेळी येथील कुत्रे हे ईशान्यकडील राज्यात पाठवा. तेथील लोक कुत्र्याचे मांस खातात, असे विधान केले होते. बच्चू कडू यांच्या 'कुत्र्याचे मांस' वक्तव्यामुळे आसाम विधानसभेत (Assam Assembly ) गोंधळ झाला. विरोधकांनी या प्रश्नी सभात्याग केला.
Bacchu Kadu : बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी पुन्हा सुनावलं, 'गद्दारांसोबत का गेलात?'
आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्र विधानसभेत भटक्या कुत्र्यांची वाढती लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी आसाममध्ये पाठवण्याचा प्रस्ताव मांडला होता. कारण ईशान्येकडील राज्यातील स्थानिक लोक कुत्र्यांचे मांस खातात, असे म्हटले होते. आमदार बच्च कडू यांच्या या विधानामुळे शुक्रवारी आसाम विधानसभेत गोंधळाचे दृश्य पाहायला मिळाले. विरोधी आमदारांनी राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांचे भाषणाच व्यत्यय आणला आणि नंतर सभात्याग केला. विरोधी आमदारांनी उभे राहून घोषणाबाजी केली. दरम्यान, हा मुद्दा सर्वप्रथम काँग्रेस आमदारांनी उपस्थित केला होता. ज्यांनी बच्चू कडू यांच्या विरोधात आसाम सरकारच्या 'निष्क्रियता'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, त्यांनी पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या कथित वक्तव्यावरुन पक्षाचे नेते पवन खेरा यांना अटक करण्यासाठी राज्याचे पोलीस पथक नुकतेच नवी दिल्ली येथे गेले होते.
एआययूडीएफचे आमदार रफीकुल इस्लाम यांनी अध्यक्ष बिस्वजित दैमरी (Speaker Biswajit Daimary) यांना बच्च कडू यांच्या वक्तव्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची स्वतःहून दखल घ्यावी आणि 'त्यांना आसाम विधानसभेत येऊन माफी मागावी' (Assam Assembly and apologise) अशी विनंती केली. तर अपक्ष आमदार अखिल गोगोई आणि सीपीआय (एम) आमदार मनोरंजन तालुकदार हे देखील त्यांच्या महाराष्ट्रातील बच्चू कडू यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विरोधी आमदारांना पाठिंबा दिला.
बच्च कडू यांच्यावर कारवाई करण्यासाठी काँग्रेस आमदार आक्रमक झालेत. काँग्रेसचे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये गेले. यावेळी अध्यक्षांनी त्यांना त्यांच्या जागेवर परत जाण्यास सांगितले आणि योग्य माध्यमांद्वारे प्रकरणाकडे जाण्यास सांगितले. या गोंधळात सर्व विरोधी आमदारांनी सभात्याग केला. आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्र विधानसभेत भटक्या कुत्र्यांना ईशान्येकडील राज्यातील स्थानिक लोक खात असल्याने त्यांची वाढती लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी आसाममध्ये पाठवण्याचा प्रस्ताव मांडला होता.