बद्रीनाथ धामची कवाडं भाविकांसाठी खुली; 7 शुभाशिर्वाद देणाऱ्या या Chardham Yatra चं महत्त्वं पाहाच
Chardham Yatra Badrinth Yatra 2023 : गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ मागोमाग बद्री विशालच्या दर्शनासाठी भाविकांना प्रवेश सुरू... चारधाम यात्रेची उत्साहात सुरुवात. इथं येऊन काय मिळतं? पाहा थक्क करणारं सत्य...
Chardham Yatra Badrinth Yatra 2023 : अतिप्रचंड बर्फवृष्टी आणि हवामानात सातत्यानं होणाऱ्या बदलांनी प्रभाविक न होता अखेर चार धामपैकी अखेरचं धाम असणाऱ्या बद्रीनाथ मंदिराची कवाडं अखेर भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी अनेक भाविक आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिराचे द्वार उघडण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात जय बद्री विशाल, असाच जयघोष कानांवर पडला आणि एक सकारात्मकता तेथील वातावरणाशी एकरुप झाली. बद्रीनाथ मंदिरातही भाविकांना प्रवेश सुरु झाल्यामुळं अखेर खऱ्या अर्थानं यंदाच्या वर्षी चारधाम यात्रेची सुरुवात झाली आहे.
काय आहे चारधाम यात्रेची धार्मिक मान्यता?
हिंदू धर्मामध्ये चारधाम यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. तुम्हाला माहितीये का, आपण ज्या यात्रेला चारधाम यात्रा म्हणून संबोधतो, ती मुळात एकाच धामाची यात्रा आहे. बडा चार धाम आणि छोटा चार धाम अशी दोन विभागात ही यात्रा केली जाते.
बडा धाममध्ये बद्रीनाथ (उत्तराखंड), द्वारका (गुजरात), जगन्नाथपुरी (ओड़िसा) आणि रामेश्वर (तमिळनाडू) या स्थळांचा समावेश होतो. तर, छोटा चार धाममध्ये केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि बद्रीनाथ धामचा समावेश होतो. छोट्या चारधाम यात्रेला दरवर्षी अनेक भाविक हजेरी लावतात. असं म्हणतात की, या प्रत्येक ठिकाणावर दिव्य शक्तींचा वावर आहे.
केदारनाथची भूमी देवादिदेव महादेवांच्या विश्रांतीची भूमी मानली जाते, तर बद्रीनाथला सृष्टीचं आठवं वैकुठं म्हटलं जातं. असं म्हणतात की, इतं विष्णू 6 महिन्यांसाठी निद्रावस्थेत असतात आणि 6 महिने जागृत असतात. बद्रीनाथांची मूर्ती शाळिग्रमापासून तयार झालीअसून ही चतुर्भूज मूर्ती ध्यानमुद्रेत पाहता येते.
चारधाम यात्रेमुळं मिळतात शुभाशिर्वाद....
नश्वर जगतातून मुक्ती मिळते - असं म्हणतात ज्यांचा या यात्रेदरम्यान मृत्यू होतो त्यांना जीवन- मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते. किंबहुना अशीही धारणा आहे की जो व्यक्ती केदारनाथांची पूजा झाल्यानंतर तेथील जल ग्रहण करतो तेव्हा त्याचा पुनर्जन्म होत नाही.
पापमुक्त होण्याचा आशीर्वाद- असं म्हणतात की चारधाम यात्रा केल्यामु तुम्ही पापमुक्त होता.
हेसुद्धा वाचा : Shani Dev: या 5 राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा, त्यांच्यावर पैशांचा वर्षाव
मानसिक शांततेचा ठेवा- कमी वयातच चारधाम यात्रेच्या वाटेवर निघणाऱ्या अनेकांना मानसिक शांततेचा मोठा ठेवा मिळतो. ही मंडळी समृद्ध आयुष्याच्या मार्गावर जातात.
दीर्घायुष्य- चारधाम यात्रेचा थेट संबंध शारीरिक सुदृढतेशी असून, या यात्रेला येणाऱ्या भाविकांना दीर्घायुष्य लाभते अशी धारणा आहे. याशिवाय जीवनात योग्य मार्गावर चालण्यासाठी एक दिव्य शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करते, जीवनातील अनेक अडथळे तुम्ही सहज ओलांडता, यशाच्या मार्गावर पुढे जाता असे अनेक शुभाशिर्वाद ही चारधाम यात्रा तुम्हाला देते.