Shani Dev: या 5 राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा, त्यांच्यावर पैशांचा वर्षाव

Shani Gochar 2023 : शनिदेवाला ग्रहांच्या न्यायाधीशाचा दर्जा देण्यात आला. मनुष्य जे काही कर्म करतो त्याचे फळ त्याला शनिदेवाकडून मिळते, असे सांगितले जाते. त्यामुळे शनिदेवाला कर्माचा दाता असेही म्हटले जाते.  काही राशींवर शनिदेवाची कृपा सदैव राहते. त्यामुळे या राशींच्या लोकांची चौपट प्रगती वेगाने होते.  

Updated: Apr 27, 2023, 08:03 AM IST
Shani Dev: या 5 राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा, त्यांच्यावर पैशांचा वर्षाव title=

Shani Gochar 2023 : अनेकांना शनिदेवाची भीती वाटत असते. जर शनीचा कोप झाला तर! त्यामुळे शनिदेवाचे नाव ऐकताच लोक घाबरतात. परंतु शनिदेव प्रत्येकवेळी संकटे आपल्यासमोर उभी करत नाही. अशी काही राशी आहेत त्या शनिदेवाला आवडतात. त्यांच्यावर शनिदेवाची नेहमीच कृपा असते. त्यामुळे या राशींच्या लोकांची प्रगती चांगली होते. 

ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला न्याय देवता म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. शनिदेवाला ग्रहांच्या न्यायाधीशाचा दर्जा देण्यात आला. मनुष्य जे काही कर्म करतो त्याचे फळ त्याला शनिदेवाकडून मिळते, असे सांगितले जाते. त्यामुळे शनिदेवाला कर्माचा दाता असेही म्हटले जाते. काही लोक शनिदेवाला घाबरत असतात. ते शनिची उपासना करतात. शनीमंदिरात जाऊन तेल आणि काळे तीळ शनिवारी वाहतात. तर काही राशींवर शनिदेवाची कृपा सदैव राहते. त्यामुळे या राशींच्या लोकांची चौपट प्रगती वेगाने होते. शनिदेवाला आवडणाऱ्या राशींबद्दल जाणून घ्या.

वृषभ

शनिदेवाच्या आवडत्या राशींपैकी एक वृषभ रास आहे.  जेव्हा वृषभ राशीमध्ये शनिची साडेसती चालू असते, तेव्हाही त्याचा प्रभाव अल्पकाळ राहतो आणि हे लोक कोणत्याही समस्येमुळे जास्त काळ दुःखी राहत नाहीत. ते नेहमी आंनंदी राहतात. या राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र आणि शनी यांच्यात मैत्री आहे, त्यामुळे या लोकांवर शनिदेवाचा फारसा प्रभाव पडत नाही.

कर्क  

अनेकांना भीती असते की शनिची साडेसाती लागली तर काय होईल. मात्र, कर्क राशीसाठी असे काहीसे होताना दिसत आहे. कारण कर्क राशीच्या लोकांनाही शनिदेव फारसा त्रास देत नाहीत. या लोकांना शनिदेवाच्या कृपेने धन आणि मानसन्मान मिळतो.  या लोकांना सतीमध्ये अडचणी येऊ शकतात. या लोकांवर शनिदेवाची कृपा असल्याने त्यांची प्रगती चांगली होते.

तूळ

शनिवदेवाची कृपा तूळ राशींच्या लोकांवर नेहमीच राहत आली आहे.  या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ चांगले मिळते. जीवनात यशस्वी होण्यासोबतच ते उच्च पदावर सहज विराजमान होतात. तूळ ही देखील शनिदेवाच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. शनीच्या कृपेने नेहमीच या राशींच्या लोकांना आशीर्वाद मिळतो. तूळ राशीच्या लोकांची सहानभुती एखाद्याला मिळत असेल तर शनिदेव त्यांना अशा कामात मदत करतो.

मकर

मकर राशींच्या लोकांवर शनिदेवाची नेहमी कृपा राहते. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यशाची डंका वाजवतात. दरम्यान, काहीवेळी मकर राशीच्या लोकांना क्वचितच शनिदेवाचा वाईट परिणाम सहन करावा लागतो. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांवरही माता लक्ष्मी प्रसन्न असते. या राशींच्या लोकांनी मेहनत केली तर यशही चांगले मिळते. मकर राशीसोबतच या राशीचाही स्वामी आहे. कुंभ राशीच्या लोकांवर तो नेहमी आपल्या आशीर्वादाचा वर्षाव करतो आणि त्याला जास्त अडचणींचा सामना करावा लागत नाही. तसेच या राशीच्या लोकांना शनिदेव क्वचितच त्रास देतात. 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)